शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

"अयोध्येचे राममंदिर हजारो वर्षे टिकेल; भूकंपातही सुरक्षित राहील"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 2:44 AM

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा दावा

अयोध्या : अयोध्येत श्रीराम जन्मभूमी स्थानावर उभारण्यात येणारे मंदिर मोठ्या भूकंपांनाही तोंड देऊ शकेल अशा मजबुतीने बांधले जाईल व ते किमान एक हजार वर्षे तरी सहज टिकेल, असे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले.पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मोठमोठ्या नद्यांवर बांधल्या जाणाऱ्या पुलांच्या खांबांप्रमाणेच या मंदिराचे खांबही मजबूत असतील व खूप खोल पाया खणून ते बांधले जाईल. त्यामुळे कोणत्याही नैसर्गिक आपत्तींना तोंड देत मंदिर हजारो वर्षे सहज टिकाव धरू शकेल. चंपत राय असेही म्हणाले की, मंदिराचे बांधकाम करणाºया लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीचे अधिकारी दोन दिवसांपूर्वी मला भेटले व मंदिराच्या पायाचा नकाशा अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. कंपनीने अंतिम नकाशा दिला की, ट्रस्ट तो अयोध्या विकास प्राधिकरणाकडून मंजूर करून घेईल. त्यासाठी जे काही शुल्क भरावे लागेल ते आम्ही भरू. त्यात कोणतीही सवलत आम्ही मागणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, अयोध्या आंदोलनात देशभरातील किमान २० हजार साधू-संतांनी भाग घेतला होता. त्या सर्वांना भूमिपूजनासाठी बोलावणे शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही अयोध्येबाहेरील ९० व अयोध्येतील ५२ साधू-संतांना निमंत्रण दिले. (वृत्तसंस्था)देशभरात स्वागतकोरोना साथीचे निर्बंध लागू असूनही भूमिपूजन करण्यावरून झालेली टीका सहन करूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत येऊन रामलल्लाचे दर्शन घेतले व साधू-संतांचे आशीर्वाद घेतले. याचे देशभरात ऐतिहासिक घटना म्हणून स्वागत झाले, असे ते म्हणाले.४२ कोटी रुपये जमामंदिर उभारणीसाठी लागणाºया पैशांविषयी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, ट्रस्टच्या खात्यात सध्या ४२ कोटी रुपये जमा आहेत. ही रक्कम लाखो लोकांनी दिलेल्या एक रुपया ते एक कोटी रुपयांच्या देणग्यांमधून जमा झाली.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर