शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

मालवीयनगरच्या जागेसाठी रस्सीखेच !

By admin | Updated: February 5, 2015 02:39 IST

आपने मालवीयनगर येथून सोमनाथ भारती यांना मैदानात उतरविले आहे़़ आपण जिंकू, असा विश्वास भारती यांनी व्यक्त केला आहे़

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील प्रतिष्ठित मालवीयनगर जागेवर भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) तिन्ही पक्ष विजयाचा दावा करीत असतानाच, खिरकी एक्स्टेंशनमध्ये अर्ध्या रात्री एका घरावर मारण्यात आलेला छापा या ठिकाणच्या मतदानात निर्णायक भूमिका साकारू शकतो़गतवर्षी दिल्लीत आपचे सरकार असताना तत्कालीन कायदामंत्री सोमनाथ भारती यांनी कथित देहविक्रय व्यवसायातील रॅकेटचा पर्दाफाश करण्याच्या उद्देशाने खिरकी एक्स्टेंशन भागातील एका घरावर मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकला होता़ पोलिसांना सोबत न घेता ही कारवाई केल्यामुळे सोमनाथ भारती टीकेचे धनी ठरले होते़आपने मालवीयनगर येथून सोमनाथ भारती यांना मैदानात उतरविले आहे़़ आपण जिंकू, असा विश्वास भारती यांनी व्यक्त केला आहे़ मात्र काँग्रेस आणि भाजपा उमेदवारांच्या मते, गतवर्षीचा ‘ खिरकी छापा’ भारतींच्या विजयातील मोठा अडसर ठरू शकतो़ काँग्रेसने या जागेवर दोनदा आमदार राहिलेले योगानंद शास्त्री यांना मैदानात उतरविले आहे़ तर भाजपाने नंदिनी शर्मा या नव्या चेहऱ्याला तिकीट दिले आहे़ १९९८ आणि २००३ मध्ये मालवीयनगर येथून निवडणूक जिंकणारे योगानंद शास्त्री यांच्या मते, ‘खिरकी छाप्यामुळे’ या भागातील लोक प्रचंड नाराज आहेत़ भारती आपचे एक लोकप्रिय नेते होते़ मात्र या घटनेनंतर त्यांची लोकप्रियता घटली आहे़ काँग्रेसला याचा फायदा मिळू शकतो़ आपने मात्र या दाव्याचे खंडन केले आहे़ ‘खिरकी छाप्यामुळे’ आपला काही प्रमाणात तोटा सोसावा लागला़ मात्र त्याचवेळी या घटनेनंतर आमच्या पक्षाला युवकांचे समर्थन वाढल्याचा आपचा दावा आहे़ भारती हे आयआयटी-दिल्लीचे माजी विद्यार्थी असल्याने विद्यार्थ्यांचाही त्यांना पाठिंबा आहे़ या भागातील बहुतांश जनता आमच्या पाठीशी आहे, असे आपच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले़ खुद्द भारती यांनी मी पुन्हा जिंकले, असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे़