शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

गुरमेहरसाठी दिल्लीत मोर्चा

By admin | Updated: March 1, 2017 04:21 IST

दिल्लीतील वातावरण भलतेच तापले असून, तिच्या समर्थनार्थ मंगळवारी डाव्या विद्यार्थी संघटनांनी मोर्चा काढला

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी गुरमेहर कौरला बलात्काराच्या आणि जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर विद्यापीठ आणि दिल्लीतील वातावरण भलतेच तापले असून, तिच्या समर्थनार्थ मंगळवारी डाव्या विद्यार्थी संघटनांनी मोर्चा काढला, तर नॅशनल स्टुडंट्स युनियन आॅफ इंडियातर्फे धरणे धरण्यात आले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तिच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणण्याच्या प्रकाराबद्दल आणि तिला अभाविपकडून दिल्या जाणाऱ्या धमक्यांबद्दल संताप व्यक्त केला आहे. तिच्या महाविद्यालयानेही गुरमेहरच्या कृतीचे समर्थन केले आहे. आपण कोणाला घाबरत नाही. मात्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्याविरोधातील (अभाविप) मोहीम थांबवत आहोत, असे गुरमेहरने म्हटले. ती आज आपल्या जालंधर या गावी गेली. तेथील माजी सैनिकांच्या संघटनेने गुरमेहरला दिल्या जाणाऱ्या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि आम्ही तिच्यामागे उभे आहोत, असे म्हटले आहे. तिच्या आजोबांनीही आपण गुरमेहरच्या मागे ठामपणे उभे राहू, असे म्हटले. समाजमाध्यमांद्वारे तिने अभाविपवर केलेल्या टीकेमुळे आणि आपले वडील पाकिस्तानचे नव्हे, तर युद्धाचे बळी आहेत, असे म्हणत दोन्ही देशांत सलोखा असावा, असे म्हटल्यामुळे भाजपचे नेते दुखावले होते. तिचे वडील कॅप्टन होते आणि ते कारगिल युद्धात शहीद झाले होते. ती लेडी श्री राम महाविद्यालयात शिकत आहे. ‘मी मोहीम मागे घेत आहे. प्रत्येकाचे अभिनंदन. मला एकटीला राहू द्या, अशी विनंती. मला जे म्हणायचे होते तेच मी म्हटले.’, असे तिने टिष्ट्वटरद्वारे म्हटले आहे.।गुन्हा दाखलगुरमेहर कौरला बलात्काराच्या धमक्या आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. या धमक्या अभाविपच्या कार्यकर्त्यांनी दिल्याचा तिचा आरोप आहे. गुरमेहर (२०) हिला धमक्या देणाऱ्यांविरुद्ध ताबडतोब प्रथम माहिती अहवाल दाखल करा अशी मागणी करणारे पत्र दिल्ली महिला आयोगाकडून पोलिसांना मिळाले होते.।शेकडोंनी काढला मोर्चादिल्ली विद्यापीठाच्या शेकडो विद्यार्थी आणि शिक्षकांनी मंगळवारी गुरमेहर कौर हिला पाठिंबा दर्शवण्यासाठी मोर्चा काढला. गेल्या काही दिवसांत एवढा मोठा मोर्चा निघाला नव्हता. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांची आंदोलने जशी प्रक्षोभक होतात तसा दिल्ली विद्यापीठाचा अनुभव नाही. नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी, प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि इतर महाविद्यालयांतील विद्वान या मोर्चात सहभागी होते. दिल्ली विद्यापीठासह देशभर विद्यापीठ परिसरात आवाज दाबून टाकण्याच्या होत असलेल्या प्रयत्नांचा निषेध होणे आवश्यक आहे. चर्चा करणे आणि मतभेद व्यक्त करण्यासाठी आम्हाला जागा हवी आहे, असे दिल्ली विद्यापीठातील आॅल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनचे नेते कंवलप्रीत कौर म्हणाले.