ख्रिश्चन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By Admin | Updated: March 24, 2015 23:38 IST2015-03-24T23:07:09+5:302015-03-24T23:38:29+5:30

सोलापूर : ख्रिश्चन समाजावर होत असलेल्या अन्याय- अत्याचाराच्या विरोधात दि. 25 मार्च रोजी सोलापूर ख्रिश्चन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती रेव्हरंड विकास रणशिंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

A rally on behalf of the Christian community on the District Collectorate | ख्रिश्चन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

ख्रिश्चन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सोलापूर : ख्रिश्चन समाजावर होत असलेल्या अन्याय- अत्याचाराच्या विरोधात दि. 25 मार्च रोजी सोलापूर ख्रिश्चन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती रेव्हरंड विकास रणशिंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दि. 15 मार्च 2015 रोजी पश्चिम बंगालमध्ये 71 वर्षीय नन्सवर दुष्कर्म करण्यात आले. दि. 17 मार्च 2015 रोजी हरियाणा येथील चर्चवर हल्ला करून तोडफोड करण्यात आली. दिल्ली येथील चर्चवर हल्ले व जाळपोळ करण्यात आली. न्यू मुंबई पनवेल चर्चवर दगडफेक केली. सोलापूर जिल्?ातही धर्मगुरूंना मारहाण व चर्चवर हल्ला करण्यात आला. याबाबत दि. 28 डिसेंबर 2014 रोजी वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व कृत्यांचा निषेध करण्यासाठी आणि अन्याय-अत्याचार थांबवून संरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मसिहा चौक, मोदी येथून निषेध मूक मोर्चा काढण्यात येणार आहे तरी समाजबांधवांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रेव्हरंड विकास रणशिंगे यांनी केले. पत्रकार परिषदेस रेव्हरंड इमान्युवेल म्हेत्रे, मोहन शाहीर, सोलापूर ख्रिश्चन समाज शहर जिल्हाध्यक्ष जॉन फुलारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: A rally on behalf of the Christian community on the District Collectorate