शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 18:26 IST

Raj Kushwaha Net Worth, Sonam Raghuvanshi: सोनमने प्रियकर राजच्या साथीने आपला पती राजा रघुवंशीच हत्या घडवून आणली

Raj Kushwaha Net Worth, Sonam Raghuvanshi: राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. तर या हत्येचे प्लॅनिंग करणारी सोनम रघुवंशी ही इंदूरमध्ये सापडली. असे म्हटले जाते की सोनमचे राज कुशवाहा याच्यासोबत अफेअर होते. तिच्याच सांगण्यावरून राज कुशवाहा याने राजा रघुवंशीची हत्या घडवून आणल्याचा आरोप केला जात आहे. अशा परिस्थितीत प्रश्न असा आहे की ज्या राज कुशवाहासाठी सोनमने आपल्या पतीला मारण्याचे प्लॅनिंग केलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती...

राज कुशवाह सोनमच्या वडिलांच्या कंपनीत करायचा नोकरी

सोनमने शरणागती पत्करल्यानंतर आणि तिच्या अफेअरची कहाणी समजल्यानंतर लोकांना राज कुशवाह कोण आहे हे जाणून घ्यायचे आहे. सोनमच्या वडिलांचा प्लायवूड कारखाना आहे. राज कुशवाहा या कारखान्यात कर्मचारी आहे. तो बिलिंगचे काम करायचा. सोनमची येथे राज कुशवाहाशी भेट झाली. त्यानंतर दोघांमधील जवळीक वाढली. कुटुंबाचा दावा आहे की त्यांना त्यांच्या प्रेमसंबंधाची काहीच कल्पना नव्हती. म्हणूनच त्यांनी सोनमचे लग्न लावून दिले.

राज कुशवाहाचा पगार किती होता?

जर आपण राज कुशवाहाच्या उत्पन्नाबद्दल आणि एकूण संपत्तीबद्दल बोललो तर त्याचा पगार फार जास्त नव्हता. त्याचे वार्षिक उत्पन्न जेमतेम दोन लाखांच्या घरात होते. प्लायवूड कारखान्यात तो बिलिंगचे काम पाहायचा. त्यानुसार, त्याचा पगार १५ ते २० हजार रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. त्याचे राहणीमानही फारसे उच्चभ्रू नव्हते. सोनमची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता, राज कुशवाहा फारच गरीब होता. पण असे असले तरीही सोनम त्याच्या आकंठ प्रेमात होती.

मिळालेल्या माहितीनुसार, राज कुशवाहाची कौटुंबिक पार्श्वभूमीही तशी फारशी चांगली नाही. सोनम त्याच्यापेक्षा खूपच श्रीमंत होती. तिच्या कुटुंबाचे इंदूरमध्ये स्वतःचे घर होते. तिथे तिच्या वडिलांचा एक मोठा प्लायवूड कारखाना आहे. त्या कारखान्यात अनेक कर्मचारी काम करतात. त्यात राज कुशवाह देखील काम करायचा. सोनम कारखान्यात जात असे. त्याच दरम्यान, दोघांची ओळख वाढली आणि सोनम राज कुशवाहाच्या प्रेमात पडली.

सोनमचा पती राजा रुघुवंशी होता श्रीमंत

दुसरीकडे, सोनमचा पती राजा रघुवंशी हा वाहतूक व्यवसायिक होता. त्याचा व्यवसाय लाखो रुपयांचा होता. तरीही, सोनमला मात्र राज कुशवाहाशीच भविष्य एकत्र घालवायचेहोते. पोलिसांनी या घटनांतील लव्ह ट्रँगलबाबत अधिक माहिती दिलेली नाही. सध्या केवळ आरोपींना रिमांडवर घेऊन चौकशी केली जात आहे. पण पुढील चौकशीत आणखीही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू