माओवादी समर्थकांविरोधात कारवाईचा धडाका, 500 जण CRPFच्या ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 08:00 AM2018-09-04T08:00:50+5:302018-09-04T09:24:45+5:30

माओवादी समर्थकांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये सीआरपीएफला मोठे यश मिळाले आहे.

Raipur big crackdown against maoists overground supporters 500 arrested | माओवादी समर्थकांविरोधात कारवाईचा धडाका, 500 जण CRPFच्या ताब्यात 

माओवादी समर्थकांविरोधात कारवाईचा धडाका, 500 जण CRPFच्या ताब्यात 

Next

रायपूर - माओवादी समर्थकांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये सीआरपीएफला मोठे यश मिळाले आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये पहिल्यांदाच माओवाद्यांविरोधात संयुक्त कारवाई करण्यात आली आणि या कारवाई अंतर्गत गेल्या वर्षभरात एकट्या 
छत्तीसगडमध्ये माओवादी समर्थक असलेल्या 500 जणांना सीआरपीएफनं ताब्यात घेतले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) महानिदेशक आर.आर.भटनागर यांनी कारवाईसंदर्भातील माहिती दिली आहे.  

एका मुलाखतीदरम्यान भटनागर यांनी सांगितले की, डाव्या विचारसरणीच्या समर्थकांचे जाळे खोलवर पसरू नये, या उद्देशाने राज्य पोलीस दलासोबत मिळून संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. सीआरपीएफनं देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये माओवाद्यांविरोधात दोन हात करण्यासाठी दहा लाख सशस्त्र सैन्य तैनात केले आहे. 

भटनागर यांनी सांगितले की, आम्ही गावागावात जाऊन माओवादी समर्थकांविरोधात कारवाई करत आहोत. माओवादी समर्थक, कार्यकर्ते आणि त्यांना माहिती पुरवणारी स्थानिक जनता या सर्वांविरोधात कारवाई करण्यात येईल, या दिशेनं आम्ही मोहीम राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. छत्तीसगडमध्ये गेल्या वर्षभरात आम्ही 500 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. शिवाय, माओवाद्यांना होणारा रसदपुरवठा कमी व्हावा, या दृष्टीकोनातून कारवाई करण्याचा प्रयत्न सुरू आहे.   

160 नक्षलवाद्यांचा खात्मा
छत्तीसगडमध्ये विशेष अभियान दलाचे नेतृत्व करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितले की, ''सुरक्षा दलावर हल्ला करण्याचा कट रचणे, नक्षलवाद्यांना सहकार्य करणे आणि नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी होणे, या सर्व घटनांमध्ये नक्षलवाद्यांना मदत करणारी मंडळी सीआरपीएफच्या रडारवर होती. या लोकांची पाळेमुळे अधिक खोलवर रूजू नयेत यासाठी त्यांच्यावर नजर ठेऊन त्यांच्याविरोधात धडक  कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, 2018च्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान 160 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.  
 

Web Title: Raipur big crackdown against maoists overground supporters 500 arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.