शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सी - व्हीजल अ‍ॅपवर तक्रारींचा पाऊस; १८ दिवसांत १३३ तक्रारी; ३४ तक्रारींचा १०० मिनटात निपटारा

By अजित मांडके | Updated: April 3, 2024 16:47 IST

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेमुळे ठाणे जिल्ह्यातही आदर्श आचारसंहिता लागू झाली असून तिचे काटेकोर पालन करण्यासाठी जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे.  जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदार संघासाठी २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

ठाणे : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या अ‍ॅपवर अवघ्या १८ दिवसात १३३ तक्रारी प्राप्त झाल्या असून यामध्ये ४ त्कारारी या लेखी स्वरूपातील आहे. त्यापैकी ३४ तक्रारींचा अवघ्या १०० मिनिटात निपटारा करण्यात आला आहे. या अ‍ॅपवर तक्रारी करतांना सेल्फी फोटो काढून अपलोड करण्यात आले असल्याचे देखिल आढळून आल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने देण्यात आली.

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेमुळे ठाणे जिल्ह्यातही आदर्श आचारसंहिता लागू झाली असून तिचे काटेकोर पालन करण्यासाठी जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे.  जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदार संघासाठी २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागून करण्यात आली असून त्याचे काटेकोर पालन करण्यासाठी आदर्श आचारसंहितेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सी व्हिजील या मोबाईल अ‍ॅपचा वापर करण्यात येत आहे. नागरिकांना एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे या अ‍ॅपमध्ये छायाचित्र अथवा व्हीडीओ काढून तक्रार नोंदविली जात आहे. या तक्रारी नोंदविताना अनेकदा तक्रारदार हे त्या प्रसंगाचे फोटो काढून तो दुसऱ्या ठिकाणाहून अपलोड करत आहे. त्यामुळे तक्रारींचा निपटारा करण्यासाठी अधिकचा वेळ खर्ची पडत आहे. 

असे असले तरी, सी - व्हीजील अ‍ॅपवर प्राप्त झालेल्या १३३ तक्रारींपैकी ३४ तक्रारींचा १०० मिनिटात निपटारा करण्यात आला आहे. तर, १०३ तक्रारींवरील कारवाई पूर्ण करून तक्रारी निकाली काढण्यात आल्या असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. 

 सेल्फी फोटोंमुळे कर्मचारी आवाकलोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी सुरु करण्यात आलेल्या सी व्हिजील अ‍ॅपवर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या अ‍ॅपवर तक्रारींचा फोटो टाकताना तक्रारदारांनी सेल्फी फोटो काढून टाकल्याने अधिकारी व कर्मचारी देखिल आवक झाले आहे. त्यानुसार आतापर्यंत सी व्हिजील ऑपवर अशा २८ तक्रारींमध्ये सेल्फी फोटो अपलोड करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पोस्टर, फलकाबाबत तक्रारीच अधिक१६ मार्च पासून लागू झालेल्या आचारसंहिता भंगाच्या आतापर्यंत १८ दिवसात सी व्हिजील अ‍ॅपवर १३३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ३४ तक्रारी अवघ्या १०० मिनीटात कारवाई करण्यात आली. या तक्रारींमध्ये राजकीय पोस्टर, फलकबाजी तसेच मोबाईलवरील जाहिराती आदींचा समावेश आहे.

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग