शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

"रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीचे व्हिडिओ काढून टाका"; रेल्वे मंत्रालयाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 12:57 IST

रेल्वे मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर घडलेल्या चेंगराचेंगरीचा व्हिडिओ काढून टाकण्यास सांगितले आहे.

New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर १५ फेब्रुवारी रोजी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले. महाकुंभ मेळ्याला जाण्यासाठी प्रवाशांची रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. त्यादरम्यान एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी धावपळ सुरु झाली आणि चेंगराचेंगरीची घटना घडली. त्यानंतर आता रेल्वे मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला (पूर्वीचे ट्विटर) नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच व्हिडिओ काढून टाकण्यास सांगितले आहे. रेल्वे मंत्रालयाने एक्सला चेंगराचेंगरीतील मृतांचे व्हिडिओ असलेल्या २८५ सोशल मीडिया लिंक्स काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. डिसेंबरमध्ये थेट  सोशल मीडिया लिंक्स काढण्याचे अधिकार मिळाल्यानंतर मंत्रालयाची ही पहिली मोठी  कारवाई आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, रेल्वे मंत्रालयाने एक्सला १५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीचे व्हिडिओ असलेल्या २८५ सोशल मीडिया लिंक्स काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयाने १७ फेब्रुवारी रोजी नैतिक मानदंड आणि प्लॅटफॉर्मच्या कंटेटच्या धोरणाचा हवाला देऊन एक नोटीस जारी केली आहे आणि ३६ तासांच्या आत कारवाई करण्याची विनंती केली आहे. असे व्हिडिओ शेअर केल्याने सार्वजनिक अशांतता निर्माण होऊ शकते आणि रेल्वेच्या कामामध्ये व्यत्यय येऊ शकतो, असं नोटीसमध्ये असे म्हटले आहे.

"हे केवळ नैतिक नियमांच्या विरोधात नाही तर एक्सच्या कंटेटच्या धोरणाचे देखील उल्लंघन करते, कारण असे व्हिडिओ अनावश्यक कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्या निर्माण करू शकतात. सोशल मीडियावरील सामग्री भारतीय रेल्वेच्या कामकाजात व्यत्यय आणू शकते, विशेषत: जेव्हा ट्रेनमध्ये सध्या खूप गर्दी आहे," असं रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे.

दरम्यान, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर दिल्ली रेल्वे विभागाने १९ फेब्रुवारी रोजी नवीन प्रोटोकॉल लागू केला आहे. या अंतर्गत कोणत्याही ट्रेनला  नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म ८ ते १६ वर येण्याची परवानगी देण्यापूर्वी स्टेशन अधिकाऱ्यांना रेल्वे प्रोटेक्शन फोर्सची परवानगी घ्यावी लागेल. प्रयागराज, पाटणा, कानपूर, लखनऊ, हावडा आदी पूर्वेकडील भागातून येणाऱ्या गाड्या या फलाटांवर धावतात आणि महाकुंभामुळे या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होत आहे. याशिवाय  नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीटही बंद आहे.

टॅग्स :New Delhi Railway Station Stampedeनवी दिल्ली रेल्वे स्टेशन चेंगराचेंगरीIndian Railwayभारतीय रेल्वे