शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत दर दोन तासांनी देणार ताजे खाद्यपदार्थ

By admin | Updated: March 22, 2017 02:47 IST

रेल्वेच्या नव्या ‘कॅटरिंग’ धोरणात खाद्यपदार्थ तयार करणे आणि त्यांचे वितरण व विक्री असे दोन स्वतंत्र भाग करण्यात आल्याने गाड्यांमध्ये प्रवाशांना दर दोन तासांनी ताजे खाद्यपदार्थ पुरविणे शक्य

नवी दिल्ली : रेल्वेच्या नव्या ‘कॅटरिंग’ धोरणात खाद्यपदार्थ तयार करणे आणि त्यांचे वितरण व विक्री असे दोन स्वतंत्र भाग करण्यात आल्याने गाड्यांमध्ये प्रवाशांना दर दोन तासांनी ताजे खाद्यपदार्थ पुरविणे शक्य होईल,असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंगळवारी येथे सांगितले.त्यासाठी प्रमुख रेल्वे स्थानके असलेल्या ठराविक अंतरांवरील शहरांमध्ये ‘बेस किचन’ सुरू केली जातील. तेथे खाद्यपदार्थ तयार करून ते रेल्वेगाड्यांमध्ये पुरविले जातील. अशी ‘बेस किचन’ चालविण्यासाठी खासगी कॅटरिंग व्यावसायिकांनी पुढे यावे, असे त्यांनी आवाहन केले. बेस किचनधील खाद्यपदार्थ रेल्वेगाड्यांमध्ये पोहोचविण्याच्या कामातही खासगी उद्योग सहभागी होऊ शकतील.देशभरात रोज काही हजार लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या धावत असतात व त्यातून प्रवास करणाऱ्या सुमारे ११ लाख प्रवाशांना रेल्वेची खान-पान सेवा जेवण व नाश्ता पुरविते. रेल्वेत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाविषयी नेहमीच तक्रारी येत असतात हे मान्य करून प्रभू म्हणाले की, आता आम्ही नवे कॅटरिंग धोरण आखले आहे. त्याची अंमलबजावणी कशी करायची यावर मंथन करून आणखी सुधारणा केल्या जातील. (लोकमत न्यूज नेटवर्क)खानपान सेवेचे दरपत्रकखानपान सेवा पुरविणारे कंत्राटदार जास्त पैसे उकळत असल्याच्या आल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने रेल्वेतील खाद्यपेयांचे दरपत्रक टिष्ट्वटरवर जाहीर केले. प्रवाशांनी याहून जास्त पैसे देऊ नयेत, बिल अवश्य मागून घ्यावे व पैसे जास्त घेतल्यास लगेच तक्रार करावी, असे आवाहनही रेल्वेने केले आहे.रेल्वेने जाहीर केलेले दरपत्रक १. कॉफी/चहा (१५0 मि.लि.) ७ रु.२. बाटलीबंद पिण्याचे पाणी (१ लिटर) १५ रु.३. शाकाहारी नाश्ता ३0 रु.४. मांसाहारी नाश्ता ३५ रु.५. शाकाहारी भोजन ५0 रु.६. मांसाहारी भोजन ५५ रु.