Bonus For Railway Employee : रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी 'दिवाळी भेट', ७८ दिवसांचा पगार 'बोनस' 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 03:45 PM2019-09-18T15:45:21+5:302019-09-18T16:01:04+5:30

Bonus For Railway Employee : साडे अकरा लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Railway employees to get 78 days salary as bonus | Bonus For Railway Employee : रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी 'दिवाळी भेट', ७८ दिवसांचा पगार 'बोनस' 

Bonus For Railway Employee : रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी 'दिवाळी भेट', ७८ दिवसांचा पगार 'बोनस' 

Next

देशात मंदीचं वातावरण असताना, त्यावर तोडगा काढण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन नवनव्या घोषणा करत असताना, केंद्रीय मंत्रिमंडळाने आज रेल्वे कर्मचाऱ्यांना खूशखबर दिली आहे. या घोषणेमुळे त्यांची दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे.



देशातील ११ लाख ५२ हजार रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून ७८ दिवसांचं वेतन देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गेली सलग सहा वर्षं रेल्वे कर्मचाऱ्यांना विक्रमी बोनस दिला जात आहे. तोच सिलसिला कायम ठेवत यंदाही त्यांना ७८ दिवसांचं वेतन बोनस म्हणून दिलं जाईल, असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केलं. याचा फायदा जवळपास साडे अकरा लाख कर्मचाऱ्यांना होईल. या बोनसवर रेल्वेचे २०२४ कोटी रुपये खर्च होणार आहेत. 



मोदी सरकारनं ई-सिगारेटवर पूर्णपणे बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. शाळकरी विद्यार्थी ई-सिगारेटच्या आहारी जात आहेत. त्यामुळेच ई-सिगारेटचा वापर, विक्री, उत्पादन, साठवणूक या सर्व बाबींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. ई-सिगारेटपेक्षा जास्त हानीकारक असलेल्या सिगारेटवर बंदी घालण्याचं पाऊल का उचलण्यात आलं नाही, असा प्रश्न पत्रकारांनी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना विचारला. त्यावर ई-सिगारेटची अनेकांना आताच लागली आहे. त्यामुळे तरुण पिढी या व्यसनाच्या आहारी जाण्याआधीच त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेत असल्याचं जावडेकर म्हणाले. 



ई-सिगारेटसोबतच ई-हुक्क्यावरदेखील बंदी आणण्यात आली आहे. या प्रकरणी पहिल्यांदा दोषी आढळल्यास १ वर्षांची शिक्षा किंवा १ लाखाचा दंड किंवा दोन्ही होऊ शकतात. यानंतर दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास ५ लाखांपर्यंतचा दंड किंवा ३ वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. 

Web Title: Railway employees to get 78 days salary as bonus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.