शहरं
Join us  
Trending Stories
1
१९७१ च्या युद्वावेळी भारतानं संधी गमावली?; करतारपूर साहिब उल्लेख करत मोदींचा मोठा डाव
2
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
3
बिल्डर 'बाळा'चा गरीब ड्रायव्हरला अडकविण्याचा प्रयत्न; म्हणतोय, मी नाही तो गाडी चालवत होता...
4
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
5
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
6
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
7
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण? पटापट चेक करा आजचे दर
8
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर
9
बांग्लादेशी खासदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवणारी महिला अटकेत; मुंबई कनेक्शनही समोर
10
Sunrisers Hyderabad Predicted XI, IPL 2024 SRH vs RR: पराभवातून धडा घेत SRH संघात करणार एक महत्त्वाचा बदल; अनुभवी स्टार खेळाडूची होणार 'एन्ट्री'
11
दीपिकाचा प्रेग्नंसी ग्लो! हिरव्या वनपीसमध्ये दिसतेय खूपच सुंदर; Video व्हायरल
12
Arvind Kejriwal : "मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
13
Sankashti Chaturthi 2024: गणपतीची आरती झाल्यावर आपण जे कवन म्हणतो, ते कुठून आलं? वाचा!
14
घटस्फोटित पती-पत्नीच आमनेसामने, काय होणार?
15
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
16
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
17
पंतप्रधान मोदींना भेटून गोविंदाने सांगितली 'मन की बात', म्हणाला - "हा माझ्यासाठी सन्मान.."
18
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
19
'सिंघम ३'च्या सेटवरुन अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर, जम्मू-काश्मीरमध्ये शूटिंग करतोय बाजीराव सिंघम
20
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!

बँकांच्या कामकाजातील ढवळाढवळ बंद करा, अन्यथा... RBIच्या कर्मचारी युनियनचा केंद्राला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 10:00 AM

रिझर्व्ह बँकेच्या कर्मचारी युनियननंही केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे.

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून सीबीआयमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या अडचणी आधीच वाढल्या आहेत. त्यातच आता रिझर्व्ह बँकेच्या कर्मचारी युनियननंही केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात त्यांनी बँकांची स्वायत्तता अबाधित ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच आरबीआयच्या कामकाजात सरकारनं हस्तक्षेप करणं थांबवावं, असंही पत्रात म्हटलं आहे.जर तुम्ही आरबीआयच्या कामातील ढवळाढवळ बंद केली नाही, तर त्याचे परिणाम भोगायलाही तयार राहा, असा इशाराच आरबीआय कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं दिला आहे. सरकारकडून बँकांच्या स्वायत्ततेला धोका पोहोचवला जातोय, असाही या पत्रात उल्लेख आहे. आरबीआयचे उपगव्हर्नर विरल आचार्य यांनीही कर्मचारी संघटनेच्या आरोपांना दुजोरा दिला आहे. ज्यात सरकार हस्तक्षेप करत असल्याचं म्हटलं आहे. आरबीआय संघटनेच्या विधानानंतर राहुल गांधींनीही मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल केंद्रीय बँकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे हे कौतुकास्पद आहे, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.भारत देश हा भाजपा आणि आरएसएसला सरकारी संस्थांवर कब्जा करू देणार नाही, याचा मला विश्वास असल्याचं म्हणत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे. खरं तर उशिरा का होईल पण पटेल आरबीआयला वाचवण्यासाठी पुढे सरसावले आहेत. पटेल आरबीआयला 'मिस्टर 56' पासून वाचवू इच्छितात. भाजपा आणि आरएसएस भारतातील संस्थांवर कब्जा करू शकत नाहीत, असं ट्विट करत राहुल गांधी म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल आणि केंद्र सरकारमध्ये सुंदोपसुंदी सुरू आहे. ऊर्जित पटेलांचे अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकारबरोबर मतभेद आहेत. त्यामुळे काँग्रेसला मोदी सरकारला घेरण्याची आयती संधी मिळाली आहे. 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकCentral Governmentकेंद्र सरकार