शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

Corona Virus: खोटे उत्सव, पोकळ भाषण नको, देशासाठी उपाययोजना करा; राहुल गांधींची मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 6:32 PM

Corona Virus: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.

ठळक मुद्देखोटे उत्सव, पोकळ भाषण नको, देशासाठी उपाययोजना कराराहुल गांधी यांचे ट्विटरवरून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्रराहुल गांधी होम क्वारंटाइन

नवी दिल्ली: संपूर्ण देशभरात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवनवे उच्चांक गाठताना दिसत आहे. कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स यांची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. एकीकडे कोरोना वाढत असताना, आरोप-प्रत्यारोप करत राजकीय वातावरणही तापताना दिसत आहे. अलीकडेच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना कोरोनाची लागण झाली आहे. राहुल गांधी सध्या क्वारंटाइन असून, त्यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. (rahul gandhi criticised pm modi and central govt over corona situation in country) 

कोरोनामुळे देशातील दिवसेंदिवस बिकट होणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींकडून पंतप्रधान मोदी सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. राहुल गांधी होम क्वारंटाइन असून, त्यांनी पंतप्रधान मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लस धोरणावर देखील टीका केली आहे. 

खोटे उत्सव, पोकळ भाषणबाजी नको

राहुल गांधी यांनी ट्विटरवरून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. घरी विलगीकरणात आहे आणि सतत वाईट बातम्या येत आहेत. भारतात संकट केवळ कोरोनाचे नाही, केंद्र सरकारचे धोरण जनतेविरोधातील आहे. खोटे उत्सव व पोकळ भाषण नाही, देशाला तोडगा द्या, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

PM मोदींच्या वाराणसीत १० तास पुरेल एवढाच ऑक्सिजन; नवे रुग्ण दाखल करण्यास मनाई

राहुल गांधींना कोरोनाची लागण

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली. सौम्य लक्षणे आढळल्यानंतर चाचणी केली असता कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी म्हटले होते. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना त्यांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. याशिवाय, राहुल गांधी यांनी कोरोनाचा कहर वाढत असल्याने पश्चिम बंगालमधील आपल्या सर्व सभा रद्द करत असल्याची घोषणा केली होती.

भारताला ‘ना नफा’ तत्त्वावर लस पुरवण्यास तयार; Pfizer ची सरकारला ऑफर

दरम्यान, केंद्र सरकारचे लस धोरण भेदाभेद करणारे असून धोरणामध्ये दुर्बल घटकांसाठी लशीची हमी देण्यात आलेली नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दुर्बल घटकांना लशीची हमी नाही, केंद्र सरकारची भेदाभेद करणारी रणनीती आहे, वितरणाची रणनीती नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण