"तू इधर उधर की न बात कर, ये बता कि..."; संबोधनात चीनचा उल्लेख न केल्याने राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 06:56 PM2020-06-30T18:56:44+5:302020-06-30T19:12:33+5:30

राहुल गांधींच्या आव्हानाकडे पंतप्रधान मोदींनी दुर्लक्ष केले. त्यांनी आपल्या भाषणात चीन मुद्दावर कसल्याही प्रकारचे भाष्य केले नाही. यानंतर काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे.

rahul gandhi and Congress attack on prime minister narendra modi after their address | "तू इधर उधर की न बात कर, ये बता कि..."; संबोधनात चीनचा उल्लेख न केल्याने राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

"तू इधर उधर की न बात कर, ये बता कि..."; संबोधनात चीनचा उल्लेख न केल्याने राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

googlenewsNext
ठळक मुद्देआज जनतेशी साधलेल्या संवादात पंतप्रधान मोदींनी कोरोना व्हायरसची सद्य स्थिती आणि अनलॉक-2 आदी मुद्द्यांवर भाष्य केले.राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना संबोधनापूर्वीच, चीन मुद्द्यवर सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले होते.राहुल गांधी यांनी ट्विट करत शायरान्या अंदाजात मोदींवर निशाणा साधला.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील नागरिकांना संबोधित केले. आपल्या संबोधनात त्यांनी कोरोना व्हायरसची सद्य स्थिती आणि अनलॉक-2 आदी मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी 80 कोटी देशवासियांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत मोफत धान्य देण्याची मोठी घोषणाही केली. मात्र, चीनसोबत सीमेवर सुरू असलेल्या वादाचा त्यांनी एकदाही उल्लेख केला नाही.

चीन मुद्द्यावर सातत्याने केंद्र सरकारवर निशाणा साधत असलेल्या राहुल गांधी यांनी, पंतप्रधानांच्या संबोधनापूर्वीच, पंतप्रधानांनी चीन मुद्द्यावरील सरकारची भूमिका आणि कारवाईसंदर्भात माहिती द्यावी, असे आवाहन केले होते. राहुल गांनी यांनी ट्विट करत प्रश्न उपस्थित केला होता, की 'चिनी सैनिक लडाखमध्ये 4 ठिकाणी बसले आहेत. नरेंद्र मोदीजी देशाला सांगा, की आपण चिनी सैन्याला देशातून केव्हा काढणार आणि कसे?

अॅप्सनंतर चीनला आणखी एक हादरा देण्याच्या तयारीत सरकार? 'या' मोठ्या कंपनीला बसू शकतो 'जोर का झटका'!

राहुल गांधींच्या या आव्हानाकडे पंतप्रधान मोदींनी दुर्लक्ष केले. त्यांनी आपल्या भाषणात चीन मुद्दावर कसल्याही प्रकारचे भाष्य केले नाही. यानंतर काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. पंतप्रधानांच्या संबोधनानंतर लगेचच राहुल गांधी यांनी ट्विट करत शायरान्या अंदाजात मोदींवर निशाणा साधला. ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी लिहिले, "तू इधर उधर की न बात कर, ये बता कि काफिला कैसे लुटा, मुझे रहजनों से गिला तो है, पर तेरी रहबरी का सवाल है." असे ट्विट करून राहुल गांधी यांनी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. 

भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!

RSS, भाजपा नेत्यांची बैठक, चीन मुद्द्यावर सरकारला मदत करणार संघ

दुसरीकडे काँग्रेसकडूनही मोदींवर हल्ला करण्यात आला आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर ट्विट करण्यात आले आहे, की मोदींकडून चीनची निंदा करणे तर दूरची गोष्ट आहे, मोदी चीनच्या मुद्द्यावर देशवासियांसोबत बोलायलाही घाबरतात. 

India-China faceoff: आता भारताला मिळाली या 'बलाढ्य' मित्राची साथ, चीनच्या 'घेराबंदी'ला सुरुवात; सामना करायला तयार

'या' मुद्द्यावर केली मोदींची तारीफ -
काँग्रेसने ट्विट करत म्हटले आहे, की आम्हाला हे ऐकूण आनंद झाला, की पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या सल्ल्याकडे लक्ष दिले. त्यांचा सल्ला ऐकूण गरिबांना मोफत भोजन देण्याच्या नियमांचा विस्तार केला.

भारताच्या 'या' खास मित्रानं घेतला सैन्य तैनातीचा निर्णय, चीनला फुटला घाम; सुरू केली भारताची 'तारीफ पे तारीफ'

Web Title: rahul gandhi and Congress attack on prime minister narendra modi after their address

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.