शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

देशात असंच चालत आलंय, राहुल गांधींनीही मान्य केला कंगना राणौतचा 'घराणेशाही'चा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 2:57 PM

गेल्या काही दिवसांपासून देशात 'घराणेशाही' या विषयावर तुफान चर्चा सुरू आहे. बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतनं बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्यावर बोट ठेवून हा मुद्दा नव्यानं चर्चेत आणला होता. आता तर कंगना राणौतचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही मान्य केल्याचे दिसत आहे.

मुंबई,दि. 12 - गेल्या काही दिवसांपासून देशात 'घराणेशाही' या विषयावर तुफान चर्चा सुरू आहे. बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतनं बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्यावर बोट ठेवून हा मुद्दा नव्यानं चर्चेत आणला होता. घराणेशाहीवरुन तिनं दिग्दर्शक-निर्माता करण जोहरलाही चांगलेच धारेवर धरले होते. बॉलिवूडमधील घराणेशाहीचा झेंडा मिरवणाऱ्यांमध्ये करणचाच पुढाकार असून तो 'मुव्ही माफिया' आहे, अशी खोचक टीका कंगनानं करण जोहरवर केली होती. आता तर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यानिमित्तान घराणेशाहीचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. राहुल यांनी असे काही विधान केले आहे की ज्यामुळे त्यांनी स्वतःहून कंगना राणौतनं केलेल्या आरोपांना अनुमोदन दिल्याचे दिसत आहे. शिवाय त्यांनी घराणेशाहीची चर्चा थेट परदेशापर्यंत नेली आहे. अमेरिकेतील बर्केल येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी घराणेशाहीवर भाष्य केले. 'देशात असंच चालत आलंय, देश घराणेशाहीमुळेच चालत आला आहे', असं विधान राहुल गांधी यांनी केले आहे. यावरुन राहुल गांधी यांनीही अभिनेत्री कंगना राणौतनं वारंवार केलेला घराणेशाहीचा आरोप मान्य केल्याचे दिसत आहे.     

घराणेशाहीवर नेमके काय म्हणाले राहुल गांधी?

घराणेशाहीवरुन राहुल गांधी यांनाही टार्गेट केले जाते. यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, 'घराणेशाहीवरुन केवळ काँग्रेस पक्षावर निशाणा साधू नये, आमच्या देशात अशाच पद्धतीनं काम चालत आहेल आहे. अखिलेश यादव, एम.के.स्टॅलिन, एवढंच नाही तर राहुल यांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीचं उदाहरण देण्यासाठी अभिषेक बच्चनच्याही नावाचा उल्लेख केला. त्यामुळे घराणेशाहीसंदर्भात मी काहीही करु शकत नाही, असेही पुढे ते म्हणालेत.  आता तर मुकेश अंबानी यांच्यानंतर इन्फोसिसमध्येही घराणेशाही दिसून येत असल्याचं त्यांनी विधान केले. 

BJPची लोकं माझ्याविरोधात अजेंडा चालवत आहेत - राहुल गांधीराहुल गांधी यांनी यावेळी असेही म्हटले की, भाजपामधील काही जण केवळ कम्प्युटरसमोर बसून माझ्याविरोधात  अजेंडा चालवत आहेत. मी मूर्ख आहे, मी असा आहे, मी तसा आहे, अशा पद्धतीनं माझ्याविरोधी ते अजेंडा राबवत आहेत. आता देशात काही मंत्र्यांमध्ये बोलणी होऊन कायदे बनवले जात आहेत, मात्र जर काँग्रेसची सत्ता आली तर जनतेशी संवाद साधून आम्ही कायदे बनवू. आता देशाची संसद नाही तर केवळ पीएमओ मजबूत आहे, असे सांगत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.  

नरेंद्र मोदी माझ्यापेक्षाही उत्तम वक्ते

दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यापेक्षा उत्तम वक्ते आहेत, अशी कबुलीही काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली. मात्र स्तुती करण्याच्या बहाण्याने त्यांनी मोदींवर टीका करण्याची संधीही सोडली नाही.  'पंतप्रधान मोदींकडे काही कौशल्यं आहेत. नरेंद्र मोदी माझ्यापेक्षाही उत्तम वक्ते आहेत', असं राहुल गांधी सुरुवातीला म्हटले. नंतर 'गर्दीतील तीन ते चार वेगवेगळ्या गटांपर्यंत आपला संदेश कसा पोहोचवायचा हे मोदींना चांगलंच माहिती आहे. आपला संदेश पोहोचवण्याची त्यांची क्षमता प्रभावी आहे', असंही राहुल गांधी म्हणालेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीKangana Ranautकंगना राणौत