शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पाकला खडसावले

By admin | Updated: January 24, 2015 02:39 IST

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारत दौऱ्याच्या तोंडावर दहशतवादी कारवायांवरून पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत खडसावले.

दहशतवाद्यांचे नंदनवन नको : ओबामांचा स्पष्ट शब्दांत इशारा नवी दिल्ली : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारत दौऱ्याच्या तोंडावर दहशतवादी कारवायांवरून पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत खडसावले. दहशतवाद्यांना पाकिस्तानने आश्रय देणे, किंबहुना ते अतिरेक्यांचे नंदनवन बनणे खपवून घेतले जाणार नाही, हे खडसावून सांगतानाच त्यांनी मुंबई हल्ल्यातील आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली. त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्याचे फर्मानच त्यांनी पाकिस्तानला सोडले. भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत दहशतवादविरोधी लढ्यातली अमेरिकेची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगत ओबामा म्हणाले, की आम्ही दहशतवादविरोधी लढ्यात पाकिस्तानसोबत काम करीत आहोत. मात्र पाकमध्ये दहशतवाद्यांना अभय देण्याची बाब खपवून घेतले जाणार नाही. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी न्यायालयीन खटल्यास सामोरे गेले पाहिजे. २६ नोव्हेंबर २००८ रोजीच्या मुंबई हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारास शिक्षा देण्याबाबत पाकिस्तानच्या गांभीर्याबाबत नव्याने सवाल उपस्थिती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ओबामांच्या या विधानास महत्त्व प्राप्त झाले आहे.हल्ल्याचा सूत्रधार जकिउर रहमान लख्वीला पाकिस्तानी न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर भारताकडून सवाल उपस्थित होत आहेत. न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यात काही भारतीयांनी जीव गमावला होता, तर २६ /११ च्या मुंबईवरील हल्ल्यात अमेरिकी नागरिकही मृत्युमुखी पडले होते, याकडे ओबामांनी लक्ष वेधले. ओबामांनी ई-मेलद्वारे दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, की आम्ही आमची सुरक्षा व आमच्या जीवन पद्धतीच्या संरक्षणासाठी एकत्रितपणे उभे आहोत, हे भारतीयांना सांगण्यासाठी आपण २०१०च्या दौऱ्यात सर्वप्रथम मुंबईच्या ताज हॉटेलला भेट दिली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)चोख सुरक्षा व्यवस्थेमुळे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या दौऱ्यादरम्यान राजधानी दिल्लीऐवजी आता देशाच्या अन्य भागांत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी राज्यांना, विशेषत: जम्मू-काश्मीरला या गंभीर धोक्याबाबत सावध केले आहे. काश्मीरमध्ये २००० साली तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या भारत दौऱ्याच्या पूर्वसंध्येला छत्तीसिंहपुरा येथे दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात ३६ जण ठार झाले होते. अशा प्रकारचा हल्ला या वेळीही होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.