हरीश गुप्ता - नवी दिल्ली
पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्याकांडावर आधारित ‘कौम दे हिरे’ या वादग्रस्त चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणल्याची घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्रलयाने गुरुवारी केली. शुक्रवार, 22 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे देशाच्या काही भागांत कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने बंदी घालण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.
इंदिरा गांधी यांच्या हत्याकांडाचे आक्षेपार्ह चित्रण असल्यामुळे गृहमंत्रलयाने मंजुरीच्या निर्णयावर फेरविचार करण्याची सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रलयाला केली होती. इंदिरा गांधी यांचे मारेकरी बेअंतसिंग, सतवंतसिंग आणि केहारसिंग यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात या तिघांच्या कृतीचे उदात्तीकरण करण्यात आल्याचा दावा सूत्रंनी केला आहे.
लाचखोरीचा आरोप असलेले सेन्सॉर बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राकेश कुमार यांनी या चित्रपटाला मंजुरी दिली असून काँग्रेससह विविध घटकांनी या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केल्याचे पाहता माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या विशेषाधिकाराचा वापर केल्याचे सांगण्यात आले. ‘कौम दे हिरे’ हा माझा चित्रपट ख:या घटनांवर आधारित असून सेन्सॉर बोर्डाने त्याला ए प्रमाणपत्र दिले आहे, असे चित्रपट निर्माते प्रदीप बन्सल यांनी सांगितले.
मिळाले ‘ए’ प्रमाणपत्र..
अनेक नेत्यांनी या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली होती. तणावाची शक्यता वर्तवत काही संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. भाजपाचे नेते लक्ष्मीकांत चावला यांनी गृहमंत्री राजनाथस्ंिाग यांना त्याबाबत पत्र पाठविले होते.
4 सेन्सॉर बोर्डाने फेब्रुवारीमध्ये निर्मात्याचे विनंती अर्ज दोनदा फेटाळले होते. विशेष म्हणजे जूनमध्ये या चित्रपटाला मंजुरी देण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. यापूर्वी 28 फेब्रुवारी 14 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असताना केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने(सीबीएफसी) त्यावर पहिल्यांदा बंदी आणली होती. मंडळाने प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्यानंतर निर्मात्याने समीक्षा समितीकडे केलेले अपीलही फेटाळण्यात आले होते.
4 या चित्रपटाला मंजुरी देण्यात लाचखोर सीईओ राकेशकुमार याने मुख्य भूमिका बजावल्याचे दिसून येते. त्याने एक लाख रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर जूनच्या अखेरच्या आठवडय़ात या चित्रपटाला मंजुरी दिल्याचा दावा सीबीआयने केला आहे. मंडळाच्या अध्यक्ष लीला सॅम्पसन यांनी या चित्रपटाला मंजुरी देण्यात आपली कोणती भूमिका नसल्याचे स्पष्ट केले आहे. माझी कारकीर्द एप्रिलच्या प्रारंभीच संपली असून मंडळाचा कार्यकाळ मे मध्ये संपला त्यामुळेच माझी कोणतीही भूमिका असण्याचे कारण नाही, असे त्या म्हणाल्या. दरम्यान निवडणुकीमुळे रिक्त जागा भरण्यात आल्या नाहीत. त्यामुळे राकेशकुमार यांना संधी मिळाली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}