शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

कन्याशाळेत मुख्याध्यापक दारूच्या नशेत; अचानक शिक्षण मंत्र्यांचा दौरा अन् झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 15:47 IST

पंजाबचे शिक्षण मंत्री हरजोत सिंग बैंस यांनी अचानक मुलींच्या शाळेत दौरा करून मुख्याध्यापकांचा पर्दाफाश केला.

नवी दिल्ली : पंजाबचेशिक्षण मंत्री हरजोत सिंग बैंस यांनी अचानक मुलींच्या शाळेत दौरा करून मुख्याध्यापकांचा पर्दाफाश केला. खरं तर बैंस त्यांच्या विधानसभा मतदारसंघात शाळांची पाहणी करण्यासाठी गेले होते. यादरम्यान ते मुलींच्या शाळेत गेले असता शाळेचे मुख्याध्यापक मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. मुख्याध्यापकांच्या कृत्याबद्दल शिक्षणमंत्र्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. तसेच त्यांनी या शाळेतील विद्यार्थिनींशी चर्चा करून सद्य स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

पंजाबचे शिक्षण मंत्री हरजोत सिंह सोमवारी देर गावातील सरकारी कन्याशाळेत गेले होते. मंत्री महोदय शाळेत जाताच शाळेचे मुख्याध्यापक दारूच्या नशेत आढळून आले. ते दररोज मद्यधुंद अवस्थेत शाळेत पोहोचतात, अशा तक्रारी अनेकांनी बैंस यांच्याकडे केल्या होत्या. ही तक्रार गांभीर्याने घेत बैंस यांनी शाळा गाठली. मुख्याध्यापकांना पाहताच ते दारूच्या नशेत होते. कठोर कारवाईच्या सूचना देत त्यांनी या लज्जास्पद कृत्यासाठी मुख्याध्यापकाला निलंबित केले आहे. 

शिक्षणमंत्र्यांनी केवळ मुख्याध्यापकांवरच कारवाई केली नाही, त्यानंतर उर्वरित शिक्षकांशी देखील चर्चा केली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान मुख्याध्यापक मद्यधुंद अवस्थेत शाळेत आले नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. यावर संतप्त झालेल्या शिक्षणमंत्र्यांनी त्यांना खडसावले आणि सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावली. एवढेच नाही तर त्यांनी इतर शिक्षकांना फटकारले असून मुलं जेव्हा मुख्याध्यापकांबद्दल तक्रार करत आहेत तेव्हा इतर शिक्षकांनी ही वस्तुस्थिती लपवायला नको होती, अशा शब्दांत बैंस यांनी शिक्षकांना धारेवर धरले. 

मुख्याध्यापकांचा माफीनामादरम्यान, शिक्षण मंत्र्यांचा आक्रमक पवित्रा पाहून संबंधित मुख्याध्यापकांनी आपली चूक मान्य केली. मुख्याध्यापक कुलदीप सिंह यांनी आपली चूक मान्य केल्याचे सांगितले जात आहे. शिक्षणमंत्र्यांसमोर चूक मान्य करत मुख्याध्यापकांनी हात जोडून माफी मागितली. या संपूर्ण घटनेनंतर बैंस यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला आणि शाळेसाठी नवीन पायाभूत सुविधांसाठी एक कोटी रुपयांची रक्कम जाहीर केली. बैंस यांच्या या दौऱ्यानंतर पालकांनी समाधान व्यक्त केले. 

टॅग्स :PunjabपंजाबEducationशिक्षणalcohol prohibition actदारुबंदी कायदाSchoolशाळा