शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराची शिक्षा, नराधमाला फक्त पाच फटके

By admin | Updated: August 22, 2014 18:39 IST

१४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणा-या नराधमाला एका पंचायतीने पाच वेळा श्रीमुखात लगावण्याची शिक्षा ठोठावली आहे.

ऑनलाइन लोकमतबिजनौर(उत्तर प्रदेश), दि. २२ - १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणा-या नराधमाला एका पंचायतीने पाच वेळा श्रीमुखात लगावण्याची शिक्षा ठोठावली आहे. पंचायतीच्या या निर्णयाचा सर्वस्तरातून विरोध होत असून प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त झळकल्यावर पोलिसांनी जाग आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. बिजनौर जिल्ह्यातील चांडक या गावात राहणा-या १४ वर्षाच्या मुलीवर गावातील तरुणाने बलात्कार केला. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास ठार मारु अशी धमकीही दिली. बुधवारी नराधम तरुणाने पुन्हा एकदा पिडीत मुलीला गाठले व तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार असह्य झाल्याने पिडीत मुलीने कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पिडीत मुलगी व तिचे आईवडिल तक्रार करण्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यात गेले. हा प्रकार गावातील पंचायतीच्या सदस्यांना समजला. त्यांनीही पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल करु नये यासाठी दबाव टाकला. पोलिसांनीही पिडीत मुलीच्या कुटुंबीयांना पंचयातीमध्ये सामोपचाराने तोडगा काढा असे सांगत तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. गुरुवारी गावातील पंचायतीने नराधम तरुणाविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल न करता पिडीत मुलीने त्याला पाच वेळा श्रीमुखात मारावे अशी शिक्षा द्यायला सांगितले. पोलिसांकडे तक्रार केल्यास मुलीच्या कुटुंबावर बहिष्कार टाकू अशी धमकीच पंचायतीने दिल्याने मुलीने नराधमाला पाच वेळा मारुन प्रकरण मिटवले. पिडीत मुलगी ही गरिब शेतक-याच्या कुटुंबातील मुलगी असून नराधम तरुण हा गावातील श्रीमंत व्यक्तीचा मुलगा आहे. वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी स्थानिक पोलिसांकडून या घटनेचा अहवाल मागवला आहे.