Punekar ranks fourth in the country in rash driving | रॅश ड्रायव्हिंगमध्ये पुणेकर देशात चौथ्या स्थानी; कोची शहर ठरले अव्वल

रॅश ड्रायव्हिंगमध्ये पुणेकर देशात चौथ्या स्थानी; कोची शहर ठरले अव्वल

ठळक मुद्देनॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने २०१९ ची देशभरातील गुन्हेविषयक माहितीचा अहवाल केला प्रसिद्ध

पुणे : पुणे शहरात वाहन चालवून दाखविले तर तो देशात कोठेही वाहन चालवू शकतो, असे विनोदाने का होईना म्हटले जात असले तरी ते काही प्रमाणात खरे आहे.नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार रॅश ड्रायव्हिंग करण्यात पुणेकर हे देशात चौथ्या क्रमांकावर आहे.कोची, सुरत, चेन्नई पाठोपाठ पुण्याचा देशात चौथा क्रमांक लागतो. 
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने २०१९ ची देशभरातील गुन्हेविषयक माहितीचा क्राईम इन इंडिया २०१९ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे. 
कोची (१०५०८), सुरत (६२८२), चेन्नई (५६४२) यानंतर पुणे (४४४२) येथे पोलिसांनी रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांवर २०१९ मध्ये कारवाई करण्यात आली होती. पुण्यानंतर दिल्ली (४२९७), बंगलुरु (४०१९), इंदौर (३०६८), मुंबई २९९६) यांचा क्रमांक लागतो. 
प्राणघातक अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, या हेतूने पुणे वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षी हेल्मेट सक्तीची मोहीम राबविली होती़ त्याचबरोबर मोठ्या रस्त्यांवर रॉन्ग ग साईडने येणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच फुटपाथवरुन वाहन चालविणाऱ्यांविरुद्धही रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल करण्यात येत होता. विशेषत: ज्याठिकाणी एकेरी वाहतूक आहे, अशा रोडच्या शेवटच्या टोकाला थांबून विरुद्ध दिशेने येणाऱ्यांवर गेल्या वर्षी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली होती. त्यामुळे पुणे शहरातील रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांची संख्या अधिक दिसत आहे. 

हिंसात्मक घटनांमध्ये घट
सर्व प्रकारच्या हिंसात्मक घटनांमध्ये गेल्या दोन वर्षात घट झाल्याचे दिसून आले असली तरी गेल्या दोन वर्षात पाटणापेक्षा पुण्यात हिंसात्मक घटना अधिक घडत असल्याचे दिसून येत आहे. दिल्ली ११ हजार ३१३ सर्व प्रकारच्या हिंसात्मक घटना २०१९ मध्ये घडल्या होत्या. त्या खालोखाल मुंबई (५९९५), बंगलुरु (३३३०), जयपूर (१८९२), पुणे (१६६१), पाटणा (१५९७) घटना घडल्या होत्या. त्याचवेळी २०१७ मध्ये पुण्यात हिंसात्मक घटना (२४७०) घडल्या असताना पाटणात (४२८२) घटना घडल्या होत्या. दोन वर्षात पाटण्यातील हिंसात्मक घटनांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Punekar ranks fourth in the country in rash driving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.