शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

Pulwama Attack : एसबीआयकडून 23 शहीद सीआरपीएफ जवानांचे कर्ज माफ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 10:32 AM

प्रत्येक जवानाला बँकेकडून 30 लाखांचा अपघाती विमा दिला जातो. 

नवी दिल्ली : देशाची सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने 14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये आत्मघाती हल्ल्यात शहीद झालेल्यांपैकी 23 जवानांचे कर्ज माफ केले आहे. या हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. 

स्टेट बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, सीआरपीएफच्या शहीद झालेल्या जवानांपैकी 23 जवानांना स्टेट बँकेने कर्ज दिले होते. या जवानांचे कर्ज तात्काळ माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीआरपीएफचे सर्व जवान संरक्षण वेतन पॅकेजद्वारे बँकेचे ग्राहक आहेत. यामुळे प्रत्येक जवानाला बँकेकडून 30 लाखांचा अपघाती विमा दिला जातो. 

बँकेनुसार शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी विम्याची रक्कम तातडीने देण्यात यावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले की, नेहमी देशाच्या सुरक्षेसाठी उन, वाऱ्याची पर्वा न करता सीमेवर पहारा देणाऱ्या जवानांना दहशतवादी हल्ल्यात मरण येणे दु:खदायक आहे. एसबीआयने या कुटुंबांना मदत करण्यासाठी एक पाऊल उचलले आहे. बँकेने भारतमातेच्या या वीरांसाठी युपीआय बनविला आहे. ज्याद्वारे लोक मदत करू शकतात. 

अक्षय कुमारसह अनेकजण मदतीसाठी सरसावलेअक्षयने शहिदांच्या कुटुंबियांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी अ‍ॅप आणि वेबसाईटची मदत घेण्याचे आवाहन केलं आहे. पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार अक्षयने केवळ दिड दिवसात सात कोटी रुपये जमवले आहेत. खुद्द अक्षयने या फंडमध्ये पाच कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. अक्षयने ज्या वेबसाईट आणि अ‍ॅपच्या माध्यमातून ही मदत केली आहे. त्याचे नाव आहे भारत के वीर.  या अ‍ॅपची सुरुवात अक्षयने २०१७मध्ये केली होती. या द्वारे अक्षयने 7 कोटींची मदत जाहीर केली आहे. 

त्यावेळी अक्षय म्हणाला होता की तो सरकारच्या मदतीने  जवान आणि त्यांच्या कुटुंबियासाठी आर्थिक मदतीचं करण्यास कटिबद्धा आहे. त्यातूनच वीर अ‍ॅपचा जन्म झाला होता. या अ‍ॅपमध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या सहाय्याने कोणतंही ट्रान्सफर शुल्क न आकारता पैसे शहिदांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवणं शक्य होणार आहे. पीपिंगमूनदेखील वाचकांना अपील करत आहे की, पुलवामामध्ये शहिद झालेल्या जवानांच्या परिवारांसाठी जास्तीत जास्त पुढे येऊन मदत करावी.

तर अमिताभ बच्चन यांनी 2.5 कोटी, शिर्डी संस्थानानेही मदत जाहीर केली होती. तसेच क्रिकेटपटूंसह अनेक खेळाडूंनीही शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाSBIएसबीआयIndian Armyभारतीय जवान