शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशकांचा विरोध मावळला

By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST

प्रकाशकांचा विरोध मावळला

प्रकाशकांचा विरोध मावळला
साहित्य संमेलन :
पुणे : घुमानला मराठी भाषिकांची संख्या कमी असल्याने पुस्तकांची विक्री होणार नाही, या भूमिकेवर ठाम राहून इतर प्रकाशक संमेलनाला गेले तर व्यावसायिक संबंध संपुष्टात येतील, असा धमकीवजा इशारा देत बहिष्काराचे शस्त्र उपसणार्‍या राज्य मराठी प्रकाशक परिषदेने अखेर साहित्य महामंडळाशी चर्चेची कवाडे खुली केली. सकारात्मक चर्चेनंतर साहित्यिक आणि प्रकाशक एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची उपरती झाल्याने अखेर आपली जहाल भूमिका मवाळ करीत संमेलनाला असलेला विरोध आता मावळल्याचे पदाधिकार्‍यांनी जाहीर केले.
........................................
त्यामुळे प्रकाशक आणि महामंडळ यांच्यात रंगलेल्या कलगीतुर्‍याला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी केलेल्या मागण्यांवर महामंडळाच्या हैदराबाद येथे २८ फेब्रुवारीला होणार्‍या कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय होणार असल्याने संदिग्धता अजूनही कायम आहे.
मराठी प्रकाशक परिषद व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पदाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य आणि प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष अरूण जाखडे यांनी भूमिका मांडली. महामंडळाचे प्रकाश पायगुडे, सुनील महाजन, मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष रमेश कुंदूर, कार्यवाह अनिल कुलकर्णी, कोषाध्यक्ष अरविंद पाटकर आणि ग्रंथविक्रेते रमेश राठीवडेकर उपस्थित होते.
डॉ. वैद्य म्हणाल्या, संमेलनातील ग्रंथप्रदर्शनामुळे अनेक वादाचे मुद्दे उपस्थित झाल्याने ताणतणावाची स्थिती निर्माण झाली होती. शेवटपर्यंत प्रकाशकांसाठी चर्चेचे दरवाजे खुले राहतील, अशी महामंडळाची भूमिका होती. अखेर त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि आम्हीही झाले गेले विसरून पुढे जाण्याचे धोरण स्वीकारले. प्रकाशक परिषदेने त्यांच्या मागण्यांचे निवेदनपत्र महामंडळाला दिले आहे. महामंडळाच्या कार्यकारिणीची बैठक २८ फेब्रुवारीला हैदराबाद येथे होणार असून, यामध्ये सकारात्मक निर्णय जाहीर केला जाईल. यामुळे प्रकाशक आणि महामंडळ यांच्यातील वादाला पूर्णविराम मिळाला आहे. प्रकाशकांनी महामंडळांशी संवाद साधून घेतलेला निर्णय स्वागताहार्य आहे.
प्रकाशकांची व्यावसायिकता या मुद्द्यावर अडून बसणार्‍या व सुरुवातीला महामंडळाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणार्‍या जाखडे यांनी नरमाइचे धोरण स्वीकारुन सर्वांनाच आ›यार्चा धक्का दिला. ते म्हणाले, २८ तारखेला महामंडळाच्या बैठकीत आमच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. तरीही इतर प्रकाशकांनी घुमानला जायचे किंवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आमची कोणतीही हरकत नाही. भविष्यातील संमेलन व प्रकाशक यात वाद होऊ नये याकरिता काळजी घेण्याची मागणी महामंडळाला करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
-----------------