उर्दू नाट्यसंमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:41+5:302015-09-07T23:27:41+5:30

सोलापूर :

Publication of the emblem of Urdu dramatization | उर्दू नाट्यसंमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

उर्दू नाट्यसंमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

लापूर :
कुल हिन्द उर्दू अदबी कॉन्फरसच्या वतीने येथे होणार्‍या अखिल भारतीय उर्दू नाट्यसंमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन विख्यात लेखक आणि नाट्य दिग्दर्शक इक्बाल नियाजी यांच्या हस्ते झाले.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महापालिकेचे सभागृह नेते संजय हेमगड्डी होते. यावेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष अँड. यू. एन. बेरिया, ज्येष्ठ कवी बशीर परवाज, प्रा. अखलाक शेख होते. यावेळी बोलताना नियाजी म्हणाले, सोलापूर हे मोठे साहित्यिक आणि सांस्कृतिक केंद्र असून, शहरवासीयांमध्ये ध्येय आणि जबरदस्त इच्छाशक्ती आहे. त्यामुळे कोणतेही कठीण काम ते सहजपणे पेलतात. हेमगड्डी म्हणाले, हे नाट्यसंमेलन तरूण पिढीला प्रेरणादायी ठरेल. भावी काळात संमेलनाच्या माध्यमातून उत्तम कलावंत तयार होतील.
या समारंभात इक्बाल सय्यद, शकील कादरी यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी अँड. बेरिया यांनी स्वागत केले. प्रा. शेख यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वकार शेख, शफी शेख, रफिक खान, राजा बागवान, सरदार नदाफ आदी उपस्थित होते.

Web Title: Publication of the emblem of Urdu dramatization