शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

हिंमत असेल तर माहिती द्या

By admin | Updated: October 23, 2014 04:31 IST

परदेशात काळा पैसा ठेवणा-यांची नावे उघड झाली तर काँगे्रसचीच अडचण होईल, असे सांगणा-या भाजपाला आता काँग्रेसनेच आव्हान दिले आहे़

नवी दिल्ली : परदेशात काळा पैसा ठेवणा-यांची नावे उघड झाली तर काँगे्रसचीच अडचण होईल, असे सांगणा-या भाजपाला आता काँग्रेसनेच आव्हान दिले आहे़ आम्हाला ब्लॅकमेल करू नका़ हिंमत असेल तर काळ्या पैसेवाल्यांची नावे उघड करून दाखवाच, असे आव्हान काँग्रेसने भाजपाला दिले़ काळ्या पैशाच्या मुद्द्यावर अर्धसत्य आणि सोयीस्कर निवडक माहिती उघड करण्यापेक्षा भाजपाने सर्व माहिती उघड करावी, असेही काँगे्रसने म्हटले आहे़परदेशात काळा पैसा ठेवणाऱ्यांची नावे उघड झाली तर आमची नाही पण काँगे्रसचीच अडचण होईल, असे वक्तव्य मंगळवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केले होते़ यावर बुधवारी काँग्रेस नेते अजय माकन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले़ काँगे्रसला अशा कुठल्याही धमक्यांमुळे ब्लॅकमेल केले जाऊ शकत नाही़ काँग्रेस पक्ष व्यक्तींपेक्षा श्रेष्ठ आहे़ काळ्या पैशाप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, असे आमचेही मत आहे़ पण केवळ सुडाच्या भावनेतून जनतेत अर्धसत्य माहिती पेरणे अयोग्य आहे़ भाजपाने काँगे्रसला ब्लॅकमेल करू नये़ त्यांच्याकडे नावे असतील तर त्यांनी ती जाहीर करावी, असे माकन यावेळी म्हणाले़ काळा पैसा परदेशात लपविणाऱ्या ८०० जणांची नावे जाहीर न करता केवळ १३६ जणांचीच नावे भाजपा का पुढे करतोय, असा सवाल करीत काळ्या पैशाबाबत भाजपा लोकांची दिशाभूल करीत असल्याची टीकाही त्यांनी केली. काँगे्रस सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनीही टिष्ट्वटच्या माध्यमातून भाजपावर तोफ डागली़ अर्थमंत्र्यांनी लोकांची दिशाभूल करणारी वक्तव्ये करण्यापेक्षा पंतप्रधानांनी निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार, प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात ते तीन लाख रुपये कधी जमा करणार आहेत, ते सांगावे़ जनधन योजनेअंतर्गत लोकांसाठी ही दिवाळीची भेट ठरेल की पुन्हा २०१९ पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असे टिष्ट्वट त्यांनी केले़ अखिल भारतीय युवक काँग्रेस अध्यक्ष राजीव सातव यांनीही काळ्या पैसावाल्यांची नावे जाहीर करण्यापासून जेटलींना कुणी रोखले आहे, असा सवाल केला़ (लोकमत न्यूज नेटवर्क)