शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलक शेतकरी घरात असते तरी मेले असते!, हरियाणाच्या कृषीमंत्र्यांचे वादग्रस्त उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 06:03 IST

farmers Protests : या प्रसंगाचा दलाल यांचा एक व्हिडीओ प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांवर झळकल्यानंतर खळबळ माजली.

चंदीगढ : नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणारे शेतकरी त्याऐवजी घरात असते तरी मरण पावले असते. आता त्यातील काही जण स्वत:च्या हाताने मरण ओढवून घेत आहेत असे अत्यंत वादग्रस्त उद्गार हरियाणाचे कृषीमंत्री जयप्रकाश दलाल यांनी काढले व त्यावर ते हसलेही.या प्रसंगाचा दलाल यांचा एक व्हिडीओ प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांवर झळकल्यानंतर खळबळ माजली. शेतकरी आंदोलनामध्ये दोनशे शेतकºयांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात भिवानी येथे एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर दलाल यांनी सांगितले की, हे शेतकरी घरात असते तरी मेले असते. सहा महिन्यांत दर एक ते दोन लाख लोकांमागे दोनशे-अडीचशे लोक मरतातच. कोणी हृदयविकाराच्या झटक्याने मरतो तर कोणी आणखी काही व्याधी होऊन. मात्र शेतकरी आंदोलनातील काही लोक स्वत:च्या इच्छेनेच मरणाला कवटाळत आहेत. या वक्तव्यावर जयप्रकाश दलाल व त्यांच्यासोबतच्या लोकांमध्ये हशा पिकला. दलाल यांच्या विधानावर काँग्रेससहित इतर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. (वृत्तसंस्था)

दलाल यांनी नंतर मागितली माफी  - या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ माजल्यानंतर हरियाणाचे कृषीमंत्री जयप्रकाश दलाल यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली.  ते म्हणाले की, माझे विधान विपर्यस्त पद्धतीने सर्वत्र प्रसारित केले जात आहे. मात्र माझ्या विधानांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन