शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राविरुद्ध साहित्यिकांचे निषेधास्त्र

By admin | Updated: October 11, 2015 03:00 IST

देशात जातीय सलोख्याची बिघडती परिस्थिती आणि हिंसाचाराच्या घटनांमुळे व्यथित झालेल्या नामवंत साहित्यिकांकडून याचा तीव्र निषेध नोंदविण्यात येत आहे.

तिरुवनंतपूरम : देशात जातीय सलोख्याची बिघडती परिस्थिती आणि हिंसाचाराच्या घटनांमुळे व्यथित झालेल्या नामवंत साहित्यिकांकडून याचा तीव्र निषेध नोंदविण्यात येत आहे. शनिवारी मल्याळी लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सारा जोसेफ यांनी आपला साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला, तर मल्याळी कवी के. सच्चिदानंदन यांनी अकादमीच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन निषेध नोंदविला. या दोघांच्याही निर्णयामुळे केरळच्या साहित्य क्षेत्रात वादळ निर्माण झाले आहे.यापूर्वी ज्येष्ठ लेखिका आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची भाची नयनतारा सेहगल आणि प्रसिद्ध कवी अशोक वाजपेयी यांनी दादरीतील घटना आणि त्यावर पंतप्रधानांच्या मौनावर नाराजी व्यक्त करीत साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले होते. त्यानंतर प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येबाबत कुठलीही कार्यवाही न झाल्याच्या निषेधार्थ लेखिका पद्मश्री शशी देशपांडे यांनी शुक्रवारी साहित्य अकादमीच्या सामान्य परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. सारा यांना त्यांच्या ‘आलाहाउदे पेनमक्कल : सर्वपिता ईश्वर की बेटियां’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आपण लवकरच कुरियरच्या माध्यमाने पुरस्काराची रोख रक्कम आणि सन्मानपत्र अकादमीला परत पाठविणार असल्याचे त्यांनी त्रिशूर येथून वृत्तसंस्थेची बोलताना सांगितले. दुसरीकडे साहित्य अकादमी लेखकांच्या पाठीशी उभे राहण्यासोबतच अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने आपले कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरले असल्याचा ठपका ठेवत सच्चिदानंदन यांनी अकादमीच्या सर्व समित्यांमधील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.सच्चिदानंदन अकादमीची सर्वसामान्य परिषद, कार्यकारी मंडळ आणि वित्तीय समितीवर कार्यरत होते. परक्कादावू यांनीसुद्धा अकादमीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. आजच्या घटनाक्रमामुळे राज्यातील साहित्य वर्तुळात मतभेद निर्माण झाले आहेत. कारण काही लेखकांनी राजीनाम्याच्या निर्णयाचा विरोध केला असून काही त्याच्या समर्थनात उभे ठाकले आहेत. (वृत्तसंस्था)ज्ञानपीठ पुरस्कार विजेते एम.टी. वासुदेवन नायर आणि प्रख्यात कवी सुगाताकुमारी यांनी निषेध नोंदविण्यासाठी पुरस्कार परत करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले आहे. कलबुर्गी हत्येच्या विरोधात सर्वप्रथम प्रसिद्ध हिंदी लेखक उदय प्रकाश यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत केला होता. अकादमी लेखकांच्या पाठीशी नाही हे बघून आपल्याला आत्यंतिक दु:ख झाले आहे. एम.एम.कलबुर्गी यांच्या हत्येनंतर मी अकादमीला लिहिले होते. त्यांनी बेंगळुरुत शोकसभा घेतली; परंतु राष्ट्रीय स्तरावर काहीही केले नाही. अकादमीने कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध नोंदविला पाहिजे.- कवी के. सच्चिदानंदन‘मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. जातीय सलोखा आणि धर्मनिरपेक्षता धोक्यात आली आहे. तीन लेखकांची यापूर्वीच हत्या झाली असून अंधविश्वासाविरुद्ध लढा देणारे कन्नड लेखक के. एस. भगवान यांच्या जिवाला धर्मांध शक्तींकडून धोका आहे; परंतु सरकारकडून मात्र लेखक, कार्यकर्ते आणि समाजाच्या इतर वर्गातील लोकांमध्ये वाढती भीती कमी करण्यासाठी पावले उचलण्यात आलेली नाहीत. - सारा जोसेफ, मल्याळी लेखिका