शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नवीन महापालिकेचा प्रस्ताव एक महिना पुढे

By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST

पुणे : महापालिकेच्या हददीजवळील तब्बल 38 गावे महापालिकेत घेण्याची प्रक्रीया राज्यशासनाने सुरू केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या पायाभूत सुविधांवर ताण येणार असून या गावांच्या विकासासाठी 25 हजार कोटी रूपयांची आवश्यकता आहे. त्यातच महापालिकेस अंदाजपत्रकास आर्थिक तूट असल्याने या बाबींचा विचार करून राज्यशासनाने नव्याने समाविष्ट होणा-या गावांसाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करावी याबाबत शासनास विनंती करणारा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या मुख्यसभेत एक महिना पुढे ढकलण्यात आला. कॉंग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे आणि मुकारी अलगुडे यांनी हा प्रस्ताव ठेवला होता.

पुणे : महापालिकेच्या हददीजवळील तब्बल 38 गावे महापालिकेत घेण्याची प्रक्रीया राज्यशासनाने सुरू केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या पायाभूत सुविधांवर ताण येणार असून या गावांच्या विकासासाठी 25 हजार कोटी रूपयांची आवश्यकता आहे. त्यातच महापालिकेस अंदाजपत्रकास आर्थिक तूट असल्याने या बाबींचा विचार करून राज्यशासनाने नव्याने समाविष्ट होणा-या गावांसाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करावी याबाबत शासनास विनंती करणारा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या मुख्यसभेत एक महिना पुढे ढकलण्यात आला. कॉंग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे आणि मुकारी अलगुडे यांनी हा प्रस्ताव ठेवला होता.
राज्यशासनाकडून मागील वर्षी हददीजवळील 34 गावे पालिकेत घेण्यासाठी विचारणा करण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेनेही त्यास अनुममती दर्शविली होती. त्यावर हरकती आणि सूचनांची प्रक्रीयाही पूर्ण झाली असून कोणत्याही क्षणी ही गावे महापालिकेत येण्याची शक्यता आहे. त्यानंतर शासनाने आणखी 4 गावे पालिकेत घेण्याबाबत विचारणा केली होती. पालिकेने जादा पाणी तसेच या गावांच्या विकासासाठी अनुदान देण्याच्या अटीवर ही जादा गावे घेण्यासही सहमती दर्शविली आहे. ही गावे महापालिकेत आल्याने त्यांचा सर्वसमावेशक विकास होणे आवश्यक आहे. मात्र, ही गावे पालिकेत आल्यास पालिकेची भौगोलिक वाढ मोठया प्रमाणात होणार असून सोयी सुविधा महापालिकेस पुरविणे शक्य होणार नाही. तसेच प्रशासकीय कारभारावर नियंत्रण ठेवणेही अवघड होणार आहे. त्यामुळे महापालिकेवर मोठा आर्थिक बोजा येणार असून त्यासाठी जवळपास 25 हजार कोटींच्या खर्चाची आवश्यकता भासणार आहे. त्यातच गेल्या काही वर्षात महापालिकेच्या अंदाजपत्रकात दरवर्षी जवळपास हजार कोटींची तूट येत असल्याने हा आर्थिक भार महापालिकेस पेलावणारा नाही. त्यामुळे नव्याने समाविष्ट होणा-या गावांची स्वतंत्र महापालिका करावी अशी विनंती राज्यशासनास करावी असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. मात्र, राष्ट्रवादी वगळता इतर पक्षाच्या सदस्यांनी त्याबाबत अक्षेप घेतल्याने तो एक महिना पुढे ढकलण्यात आला.
===========================