शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मार्च अखेरपर्यंत निधी खर्च न झाल्यास अधिकारी जबाबदार डीपीसी बैठकीत पालकमंत्र्यांची तंबी : ६८५ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

सूचना -बातमीला जोड आहे.

सूचना -बातमीला जोड आहे.
नागपूर: विविध विकास योजनांसाठी लोकप्रतिनिधी शासनाकडून निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न करीत असताना दुसरीकडे प्राप्त निधी वेळेत खर्च होत नाही. यापुढे ही बाब खपवून घेणार नाही. गत वर्षी जिल्हा नियोजन समितीने दिलेला निधी या वर्षी मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत खर्च झाला नाही तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवून त्यांच्या सेवा पुस्तिकेत याबाबत नोंद करण्याची शिफारस केली जाईल, अशी तंबी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिली.
जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) बैठक शुक्रवारी अमरावती मार्गावरील नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हेच्या सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. सुरुवातीला २०१४-१५ च्या योजनेतील डिसेंबर महिन्यापर्यंत झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला आणि २०१५-१६ साठी ६८५.४० कोटींच्या वार्षिक योजनेच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. त्यात सर्वसाधारण योजनेचे ४४४.५९, अनुसूचित जाती उपाययोजना १३६.२३, आदिवासी उपाययोजना २६.०८ आणि ओटीएसपीच्या ७८ कोटींच्या योजनांचा समावेश आहे. शासनाने या वर्षीच्या वार्षिक योजनेसाठी ३८२.७० कोटीची मर्यादा ठरवून दिली आहे. गत वर्षी सर्वसाधारण योजनेत १७५ कोटींवरून २२५ कोटींपर्यंत वाढ करण्यात आली होती. यंदा यापेक्षा दुप्पट म्हणजे ४४४.५९ कोटींची प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. गत वर्षीच्या तुलनेत या वर्षी नागपूर जिल्ह्याला जास्तीतजास्त निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गतवर्षी जिल्हा वार्षिक योजनेच्या एकूण ४२० कोटींपैकी २४८ कोटी रुपये प्राप्त झाले असून त्यापैकी २२४ कोटी वितरित करण्यात आले. यापैकी नोव्हेंबर अखेरपर्यंत १६१ कोटी खर्च (७१ टक्के) झाले. अनेक विभाग त्यांच्याकडे आलेला निधी खर्च करीत नाही, अशी तक्रार बैठकीत उपस्थित बहुतांश आमदारांनी केल्यावर बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून याची माहिती घेतली. त्यावेळी कृषी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जि.प.बांधकाम विभागासह इतरही काही विभागाने निधी खर्च केला नसल्याचे उघड झाले. गतवर्षीचा शिल्लक निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करावा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल व त्यांच्या सेवापुस्तिकेत याची नोंद करण्याची शिफारस केली जाईल, असे बावनकुळे म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन व आभार जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके यांनी केले. बैठकीत जिल्ह्यातील विविध समस्यांवर चर्चा झाली.