शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम, हायकोर्टांकडून प्रक्रिया पालन होत नाही; न्यायाधीशांच्या रिक्त जागा भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 03:58 IST

सरकारनेही केले न्यायपालिकेला लक्ष्य

नवी दिल्ली : उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना होत असलेल्या विलंबावरून सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यावर मंगळवारी सरकारने सर्वोच्च व उच्च न्यायालयांकडून प्रक्रियेचे उघड उल्लंघन होत असल्याचा आरोप केला. न्यायाधीशांची जागा रिक्त होणार त्याच्या सहा महिने आधी जी प्रक्रिया (एमओपी) सुरू करणे बंधनकारक आहे, तिचे पालन होत नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठी मेमोरँडम ऑफ प्रोसिजर ही सरकार आणि न्यायपालिका यांच्यातील लेखी सहमती आहे. २६ मार्च रोजी न्यायाधीशांच्या ४१० जागा रिक्त होत्या. उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने २१४ जागांसाठी (५२ टक्के) शिफारस केलेली नाही. २७ मार्च रोजी सरन्यायाधीश एस. ए. बोबडे आणि न्यायमूर्ती एस. के. कौल आणि सूर्य कांत यांनी ॲटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांना उच्च न्यायालय कॉलेजियमने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी सहा ते १४ महिन्यांसाठी नियुक्त करण्यासाठी ४५ नावांची केलेली शिफारस सरकारने का दाबून ठेवली याचा खुलासा ८ एप्रिल रोजी करण्यास सांगितले. ही शिफारस झालेली नावे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमकडे छाननीसाठी का पाठवली नाहीत, असेही वेणुगाेपाल यांना विचारण्यात आले. न्यायमूर्ती कौल यांनी सरकार सर्वोच्च न्यायालय कॉलेजियमने उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्त करण्यासाठी १० नावांना मान्यता दिल्यानंतर त्यावर काहीच कार्यवाही करीत नसल्याचे लक्षात आणून दिले. या नियुक्त्या या सात ते १९ महिन्यांसाठीच्या आहेत.बार कोट्यातून जुन्या रिक्त जागा कायदा मंत्रालयातील सूत्रांनी म्हटले की,‘ओडिशा उच्च न्यायालयात सगळ्यात जुनी (१४ ऑक्टोबर, २०१४) रिक्त जागा ही ॲडव्होकेटस कोट्यातून भरली जायची आहे. आज सहा वर्षांनंतरही उच्च न्यायालय कॉलेजियमने शिफारस केलेली नाही. इतर नऊ उच्च न्यायालयांतही बार कोट्यातून जुन्या रिक्त जागा भरण्यासाठी पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतरही शिफारस केली गेलेली नाही.’

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालय