शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बाबा रामपालच्या अडचणी आणखी वाढल्या

By admin | Updated: November 21, 2014 03:15 IST

हजारो पोलिसांनी सलग तीन दिवस राबविलेल्या मोहिमेनंतर न्यायालयीन अवमाननाप्रकरणी अटक करण्यात आलेला स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू बाबा रामपाल याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे़

चंदीगड/बरवाला : हजारो पोलिसांनी सलग तीन दिवस राबविलेल्या मोहिमेनंतर न्यायालयीन अवमाननाप्रकरणी अटक करण्यात आलेला स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू बाबा रामपाल याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे़ पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने गुरुवारी २००६ मधील एका हत्येप्रकरणी त्याला दिलेला जामीन रद्द केला़ या प्रकरणाची सुनावणी आता २८नोव्हेंबरला होणार आहे़ तोपर्यंत रामपालला न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे़हरियाणाचे महाधिवक्ता आणि हिस्सारच्या बरवाला ठाण्याच्या एसएचओंनी अवमाननाप्रकरणी रामपालला अटक झाल्याचे न्यायालयाला सांगताच न्या़ एम़ जयपाल आणि न्या़ दर्शन सिंह यांच्या पीठाने तात्काळ संबंधित हत्येप्रकरणी बाबाचा जामीन रद्द केला आणि त्याला याप्रकरणी अटक करण्याचे आदेश दिले़ २००६ मध्ये रोहतक जिल्ह्याच्या आश्रमात झालेल्या धुमश्चक्रीनंतर एका व्यक्तीची हत्या झाली होती़ याप्रकरणी रामपाल याच्यावर कट रचल्याचा आरोप ठेवून गुन्हा नोंदवण्यात आला होता़ बाबा याप्रकरणी जामिनावर होता़ तो सुनावणीला सातत्याने गैरहजर राहात होता. त्यामुळे त्याला २१ नोव्हेंबरपर्यंत अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते आणि त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंटही जारी केले होते. गेल्या १५ दिवसांपासून आपले समर्थक आणि ‘खासगी कमांडों’ना समोर करून बाबा रामपाल सतपाल आश्रमात दडून बसला होता़ रामपालला अटक होऊ नये यासाठी त्याच्या १५ हजार भक्तांनी आश्रमात ठाण मांडून पोलिसांना कारवाई करण्यास रोखले होते. मंगळवारी रामपाल समर्थक आणि पोलीस यांच्यादरम्यान जोरदार धुमश्चक्री उडाली होती़ यात सुमारे २०० लोक जखमी झाले होते़ यादरम्यान सहा जणांचा गूढ मृत्यूही झाला होता़ मात्र बुधवारी रात्री उशिरा अनेक दिवसांपासूनची तणावपूर्ण कोंडी फोडत पोलिसांनी रामपालला जेरबंद केले होते़ गुरुवारी त्याला पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात हजर केले असता २८ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. (वृत्तसंस्था)