चीनच्या षडयंत्राला बळ देऊ नका; नरेंद्र मोदींना मनमोहन सिंहांचा सल्लावजा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 10:22 AM2020-06-22T10:22:32+5:302020-06-22T11:28:34+5:30

15-16 जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीत भारताच्या 20 लढवय्या जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले. या सैनिकांनी साहसाने कर्तव्य पार पाडले. देशाच्या या जवानांनी शेवटच्या श्वासापर्यंत देशाची सेवा केली. त्यासाठी आम्ही जवानांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे  कृतज्ञ आहोत. त्याचे बलिदान व्यर्थ जाता कामा नये, असे मनमोहन सिंग म्हणाले.

Prime Minister should use the word carefully; Manmohan Singh's advice to Narendra Modi | चीनच्या षडयंत्राला बळ देऊ नका; नरेंद्र मोदींना मनमोहन सिंहांचा सल्लावजा इशारा

चीनच्या षडयंत्राला बळ देऊ नका; नरेंद्र मोदींना मनमोहन सिंहांचा सल्लावजा इशारा

Next

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गलवान घाटीमध्ये भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नये, असे आवाहन करताना त्यांनी मोदींवर निशानाही साधला आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या शब्दांची निवड सावधानतेने करावी असा सल्ला दिला आहे. मनमोहन सिंगांनी म्हटले आहे की, 15-16 जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीत भारताच्या 20 लढवय्या जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले. या सैनिकांनी साहसाने कर्तव्य पार पाडले. देशाच्या या जवानांनी शेवटच्या श्वासापर्यंत देशाची सेवा केली. त्यासाठी आम्ही जवानांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे  कृतज्ञ आहोत. त्याचे बलिदान व्यर्थ जाता कामा नये. 


आज आपण इतिहासातील एका नाजूक वळणावर उभे आहोत. आपल्या सरकारचे निर्णय आणि सरकारने उचललेली पाऊले भविष्यातील पिढ्यांनी आपले कसे आकलन करावे हे ठरवणार आहेत. जे देशाचे नेतृत्व करत आहेत, त्यांच्या खांद्यावर कर्तव्याचे मोठे दायित्व आहे. आपल्या लोकशाहीमध्ये हे दायित्व पंतप्रधानाचे असते. यामुळे पंतप्रधानांनी आपल्या शब्दांद्वारे देशावर होणारे परिणाम, रणनीती, सुरक्षा, भौगोलिक हित आदींच्या परिणामांसाठी खूप सावध रहायला हवे, असा सल्ला सिंग यांनी दिला आहे. 


चीनने एप्रिल 2020 पासून आजपर्यंत भारतीय सीमेमध्ये गलवान घाटी आणि पेंगाँग शो लेक परिसरात अनेकदा घुसखोरी केली आहे. आम्ही ना ही त्यांच्या धमक्यांना भीक घालणार, नाही त्यांच्या दबावापुढे झुकणार आहोत. देशाच्या अखंडतेबाबत कोणताही समझोता करण्याच येणार नाही. पंतप्रधानांनी त्यांच्या वक्तव्यातून चीनच्या षडयंत्राला बळ देऊ नये. तसेच सरकारचे सर्व विभाग या संकटाला एकत्रितपणे कसे सामोरे जातील, हे पहावे, असा सल्ला मनमोहन सिंग यांनी दिला. 


एकजूट व्हायची वेळ
ही वेळ चीनविरोधात साऱ्या देशाने एकजूट होण्याची आहे. तरच चीनला चोख प्रत्यूत्तर देता येऊ शकेल. भ्रामक प्रचार कधीही कूटनीती आणि मजबूत नेतृत्वाला पर्याय असू शकत नाही, हे लक्षात ठेवावे. खोटे पसरवून सत्य कधीही लपविले जाऊ शकत नाही, असेही मनमोहन सिंग म्हणाले. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

देशाशी नडला, महाराष्ट्राने झोडला! चीनच्या ग्रेट वॉल मोटर्ससह तीन प्रकल्प थांबवले

चीनला खुमखुमी! भारतानंतर जपानवर डोळा; आशिया खंडावर दाटले महायुद्धाचे ढग

मगरमिठी! निम्म्याहून अधिक जगावर चीनच्या कर्जाचा डोंगर; भारतात एवढा नंबर

High अलर्ट! भारतावर सर्वांत मोठ्या सायबर हल्ल्याची शक्यता; मोठ्या संकटाचा इशारा

२५ हजारांपेक्षाही स्वस्त किंमतीत OnePlus चा फोन येणार; एकापेक्षा एक धासू फिचर देणार

Read in English

Web Title: Prime Minister should use the word carefully; Manmohan Singh's advice to Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.