High अलर्ट! भारतावर सर्वांत मोठ्या सायबर हल्ल्याची शक्यता; संकटाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 03:07 PM2020-06-21T15:07:49+5:302020-06-21T15:20:30+5:30

CERT-In नुसार भारतात मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ला केला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये खासगी व्यक्तीसह मोठमोठ्या व्यवसायांनाही धोका पोहचणार आहे.

High alert! possibility of the biggest cyber attack on India; Serious warning | High अलर्ट! भारतावर सर्वांत मोठ्या सायबर हल्ल्याची शक्यता; संकटाचा इशारा

High अलर्ट! भारतावर सर्वांत मोठ्या सायबर हल्ल्याची शक्यता; संकटाचा इशारा

googlenewsNext

नवी दिल्ली : भारतामध्ये लॉकडाऊनमुळे इंटरनेट यूजर आणि इंटरनेटचा वापर कमालीचा वाढला आहे. याचबरोबर सायबर हल्लेही वाढू लागले आहेत. भारत सरकारची सायबर सिक्युरिटी नोडल एजन्सी CERT-In यावर गंभीर इशारा दिला आहे. 


CERT-In नुसार भारतात मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ला केला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये खासगी व्यक्तीसह मोठमोठ्या व्यवसायांनाही धोका पोहचणार आहे. हे हल्लेखोर कोरोना व्हायरस किंवा त्यासंबंधी नावाचा वापर करू शकतात.  याद्वारे इमेल पाठवून खासगी माहितीसह आर्थिक माहिती चोरली जाऊ शकते. फिशिंगसारखे हातखंडे वापरून सरकारी एजन्सी, वेगवेगळी खाती आणि व्यापाराचे नाव वापरूनही हे हल्ले होऊ शकतात. या मेसेजमध्ये युजरला सरकारी मदत देण्याविषयीचे प्रलोभन दिले जाणार आहे. 


कोरोना व्हायरसशी संबंधीत फिशिंग अटॅक आजपासून सुरु केला जाऊ शकतो. यासाठी 'ncov2019@gov.in' सारखे ईमेल अॅड्रेसचा वापर केला जाऊ शकतो. gov.in हा अॅड्रेस सरकारी असतो. मात्र, याची नक्कल करून खरा भासणारा ईमेल तयार केला जातो. स्थानिक प्रशासनाचे नाव वापरूनही हल्लेखोर सायबर हल्ला करू शकतात. या ईमेलवर अजिबात विश्वास ठेवू नका. यावर क्लिक केल्यास तुम्हाला त्यांचे जाळे असलेल्या लिंक्सवर रिडायरेक्ट केले जाईल. येथे युजरची खासगी माहिती, बँकेचे डिटेल्स आदगी मागितले जाईल. तुमची माहिती चोरण्याचे यामागे कारस्थान असणार आहे. 


असा बचाव करा...
CERT-In ने या हल्ल्यापासून वाचण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. याद्वारे तुम्ही सुरक्षित राहू शकता. एजन्सीने सांगितले की, या ईमेलवर विश्वास ठेवू नका. कॉन्टॅक्ट लिस्टमधूनही तुम्हाला काही मेल येऊ शकतात. त्याची खात्री करूनच ईमेलमध्ये एखादी लिंक असल्यास ओपन करावी. कॉन्टॅक्ट लिस्टबाहेरून आलेले ईमेल चुकूनही उघडू नका. याशिवाय अँटीव्हायरसचा वापर करावा. फायरवॉलही अपडेट करावी. महत्वाचे डॉक्य़ुमेंट असतील तर ते इन्क्रीप्ट करून ठेवावेत.

अन्य महत्वाच्या बातम्या...

Solar Eclipse : ग्रहण संपताच...! शास्त्रानुसार करा घराची शुद्धी; हे आहेत सोपे उपाय

मगरमिठी! निम्म्याहून अधिक जगावर चीनच्या कर्जाचा डोंगर; भारतात एवढा नंबर

Solar Eclipse 2020 : दुर्लभ योग! सूर्याने रंग बदलले; पहा सूर्यग्रहणाची टिपलेली छायाचित्रे

CoronaVirus देशाला कोरोनाचे ग्रहण! रुग्णांचा आकडा 4 लाख पार; मृत्यूचा उच्चांक

२५ हजारांपेक्षाही स्वस्त किंमतीत OnePlus चा फोन येणार; एकापेक्षा एक धासू फिचर देणार

Solar Eclipse 2020 : थोड्याच वेळात यंदाचे सर्वांत मोठे सूर्यग्रहण; 'इथे' LIVE पाहता येणार

Web Title: High alert! possibility of the biggest cyber attack on India; Serious warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.