२५ हजारांपेक्षाही स्वस्त किंमतीत OnePlus चा फोन येणार; एकापेक्षा एक धासू फिचर देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 10:00 AM2020-06-21T10:00:48+5:302020-06-21T10:05:28+5:30

कंपनीने या फोनची अधिकृत माहिती दिलेली नसली तरीही वनप्लसचे सह संस्थापक कार्ल पे यांनी ट्विटकरून या डिव्हाईसचे संकेत दिले आहेत.

OnePlus Z will cheaper than Rs 25,000; will give iphone SE fight | २५ हजारांपेक्षाही स्वस्त किंमतीत OnePlus चा फोन येणार; एकापेक्षा एक धासू फिचर देणार

२५ हजारांपेक्षाही स्वस्त किंमतीत OnePlus चा फोन येणार; एकापेक्षा एक धासू फिचर देणार

googlenewsNext

कमी कालावधीतच चीनच्या OnePlus या प्रिमिअम स्मार्टफोन कंपनीने सॅमसंग, अॅपलला टक्कर दिली आहे. मात्र, या कंपनीचे फोन 35 ते 50 हजाराच्या रेंजमध्ये उपलब्ध असल्याने सामान्य ग्राहकांना परवडणारे नव्हते. यामुळे वनप्लसने कमी किंमतीचा फोन भारतीय बाजारासह जगभरात उतरविण्याचे ठरविले आहे. यानुसार OnePlus Z हा स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाणार आहे. 


कंपनीने या फोनची अधिकृत माहिती दिलेली नसली तरीही वनप्लसचे सह संस्थापक कार्ल पे यांनी ट्विटकरून या डिव्हाईसचे संकेत दिले आहेत. या ट्विटवरून नव्या OnePlus Z च्या किंमतीचा अंदाज येत आहे. ट्वीटनुसार 299 डॉलर (22,799 रुपये) या फोनची किंमत असणार आहे. हा फोन जुलैमध्ये लाँच केला जाऊ शकतो. 


कार्ल पे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये 2014 मध्ये केलेले कंपनीचे एक जुने ट्विट एम्बेड आहे. हे ट्विट तेव्हाचे आहे जेव्हा कंपनीने पहिला वनप्लस One लाँच केला होता. या ट्विटमध्ये फोनचे नाव तर नाही घेतले गेलेय परंतू नव्या फोनची किंमत पहिल्या वनप्लसएवढी असण्याची शक्यता आहे. कंपनीने 299 डॉलरला हा स्मार्टफोन लाँच केला होता. ही किंमत फोनच्या 16 जीबी मॉडेलची होती. 


या ट्विटनंतर उडालेल्या अफवांनुसार अॅपलचा आयफोन SE आणि गुगलच्या Pixel 4a ला टक्कर देण्यासाठी हा स्वस्त अँड्रॉईड फोन आणला जाणार आहे. जर या फोनची किंमत 299 डॉलर असेल तर तो आयफोन एसईपेक्षा 100 डॉलर  आणि पिक्सल 4ए पेक्षा 50 डॉलरने स्वस्त असणार आहे. सध्या वनप्लसचा कोणताही फोन  iPhone SE ला टक्कर देत नाही. वनप्लसने नुकतेच वनप्लस 8 आणि वनप्लस 8 प्रो फोन लाँच केले आहेत. ते iPhone 11 आणि गॅलेक्सी S20 चे प्रतिस्पर्धी आहेत. 




भारतात किती असेल किंमत? 
एका सर्व्हेनुसार भारतात वनप्लस झेडची सुरुवातीची किंमत 24,990 रुपये असू शकते. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर, 90Hz अमोल्ड डिस्प्ले, क्वाड रिअर कॅमेरा आणि 4,000mAh बॅटरी असू शकते. 
 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Solar Eclipse 2020 : थोड्याच वेळात यंदाचे सर्वांत मोठे सूर्यग्रहण; 'इथे' LIVE पाहता येणार

अंकिता, तूच सुशांतला वाचवू शकली असतीस, पण...; मित्राची भावनिक पोस्ट

घरातच काढलेत! हे भन्नाट फोटो पहाल तर चक्कर येऊन पडाल

राज्यसभेत एनडीए आता सर्वांत मजबूत स्थितीत; पण...

Web Title: OnePlus Z will cheaper than Rs 25,000; will give iphone SE fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.