"भारत काय करू शकतो, हे लडाखमध्ये संपूर्ण जगानं पाहिलं"; लाल किल्ल्यावरून चीन-पाकवर बोलले मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 09:43 AM2020-08-15T09:43:16+5:302020-08-15T09:51:36+5:30

लाल किल्यावरून मोदी म्हणाले, एवढी मोठी आपत्ती असतानाही सीमेवर देशाच्या सामर्थ्याला आव्हान देण्याचा गलिच्छ प्रयत्न झाला आहे. मात्र, LoC पासून ते LAC पर्यंत देशाच्या सार्वभौमत्वाकडे ज्याने डोळा वर करून पाहिले, त्याला आपल्या वीर जवानांनी त्याच भाषेत चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Prime minister narendra modi red fort independence day speech commented on china and pakistan | "भारत काय करू शकतो, हे लडाखमध्ये संपूर्ण जगानं पाहिलं"; लाल किल्ल्यावरून चीन-पाकवर बोलले मोदी

"भारत काय करू शकतो, हे लडाखमध्ये संपूर्ण जगानं पाहिलं"; लाल किल्ल्यावरून चीन-पाकवर बोलले मोदी

Next
ठळक मुद्देआज संपूर्ण देश 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.भारताच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी संपूर्ण देश एक आहे.दहशतवाद असो अथवा विस्तारवाद भारत त्याचा संपूर्ण शक्तीनिशी सामना करत आहे

नवी दिल्ली - आज संपूर्ण देश 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी मोदी म्हणाले, "LoC पासून ते LAC पर्यंत, ज्याने कुणी भारताकडे डोळा वर करून पाहिले, त्यांना आपण चोख प्रत्त्युत्तर दिले आहे. आपले जवान काय करू शकतात हे संपूर्ण जगाने लडाखमध्ये पाहिले आहे."

लाल किल्यावरून मोदी म्हणाले, एवढी मोठी आपत्ती असतानाही सीमेवर देशाच्या सामर्थ्याला आव्हान देण्याचा गलिच्छ प्रयत्न झाला आहे. मात्र, LoC पासून ते LAC पर्यंत देशाच्या सार्वभौमत्वाकडे ज्याने डोळा वर करून पाहिले, त्याला आपल्या वीर जवानांनी त्याच भाषेत चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी संपूर्ण देश एक आहे आणि संकल्पबद्ध आहे आणि आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवत पुढे वाटचाल करत आहे. या संकल्पासाठी आपले वीर जवान काय करू शकतात, देश काय करू शकतो हे लडाखमध्ये संपूर्ण जगाने पाहिले आहे.

दहशतवाद असो, की विस्तारवाद भारत संपूर्ण ताकदी निशी सामना करतोय - 
यावेळी, "मी आज मातृभूमीसाठी बलिदान दिलेल्या त्या सर्व जवानांना आदरपूर्वक नमन करतो. दहशतवाद असो अथवा विस्तारवाद भारत त्याचा संपूर्ण शक्तीनिशी सामना करत आहे," असेही मोदी म्हणाले.

शांततेसाठी जेवढे प्रयत्न, तेवढीच तयारी सुरक्षितेसाठीही -
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारताचा जेवढा प्रयत्न शांता आणि सौहार्दासाठी आहे, तेवढीच तयारी आपल्या सुरक्षिततेची आणि आपली सैन्य शक्ती मजबूत करण्याचीही आहे. आता आपला देश संरक्षण साहित्याच्या उत्पादनातही पूर्णपणे आत्मनिर्भर होण्यासाठी संपूर्ण शक्तीनीशी कामाला लागला आहे. देशाच्या संरक्षणात आपल्या सीमा आणि कोस्टल इंफ्रास्ट्रक्चरचीही मोठी भूमिका आहे. 

मोदी म्हणाले, हिमालयातील शिखरे असो वा हिंदी महासागरातील बेटे, आज देशात रस्ते आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभूतपूर्व विस्तार झाला आहे आणि होत आहे.

...तेव्हाच आपण एक भारत-श्रेष्ठ भारताची कल्पना साकार करू शकू -
मोदी म्हणाले, आज भारताने फार कमी काळात अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. याच इच्छाशक्तीने प्रत्येक भारतीय नागरिकाला पुढे चालायचे आहे. लवकरच भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. आपली धेय धोरणे, आपली प्रक्रिया आणि आपले प्रोडक्ट सर्वकाही सर्वश्रेष्ठ असायला हवे. तेव्हाच आपण एक भारत-श्रेष्ठ भारताची कल्पना साकार करू शकू.

देशातील तरुण, महिला शक्तीवर माझा पूर्ण विश्वास -
अंतराळ क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होतो, तेव्हा शेजाऱ्यांनाही त्याचा फायदा होतो. ऊर्जा क्षेत्र, आरोग्य क्षेत्रात आत्मनिर्भर झाल्यास भारत जगाचे हेल्थ डेस्टिनेशन बनेल. कोरोना संकटात 'आत्मनिर्भर भारत' हा 130 कोटी भारतीयांसाठी मंत्र बनला आहे. 'आत्मनिर्भर भारत' हे स्वप्न प्रत्यक्षात येणारच. देशातील तरुण, महिला शक्तीवर माझा पूर्ण विश्वास असल्याचे मोदी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!

Gold Price : येणाऱ्या काळात आणखी स्वस्त होणार सोनं! विकत घेण्यापूर्वी अवश्य वाचा ही बातमी

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVirus vaccine News: फक्त 18 ते 60 वर्षांच्या आतील लोकांनाच दिली जाणार रशियन कोरोना लस, हे आहे मोठं कारण

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

कोरोनावरील उपचारांचा खर्च..., मुळीच घाबरू नका; 'कोरोना कवच' घ्या! मिळेल असा फायदा

Web Title: Prime minister narendra modi red fort independence day speech commented on china and pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.