पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली रेल्वे अपघातातील मृतांना श्रद्धांजली

By Admin | Updated: January 22, 2017 09:31 IST2017-01-22T09:31:13+5:302017-01-22T09:31:13+5:30

जगदलपूर- भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसला झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Prime Minister Narendra Modi paid homage to the dead in a vehicle accident | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली रेल्वे अपघातातील मृतांना श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली रेल्वे अपघातातील मृतांना श्रद्धांजली

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 22 -  जगदलपूर- भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसला झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच रेल्वेमंत्री अपघातानंतर  निर्माण झालेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, मदत आणि बचाव कार्य वेगात होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 
आज सकाळी ट्विट करत पंतप्रधानांनी अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. "हिराखंड एक्स्प्रेसला झालेल्या अपघातात मरण पावलेल्यांप्रति मी संवेदना व्यक्त करतो. या अपघातात जखमी झालेले या धक्क्यातून लवकर सावरोत यासाठी मी प्रार्थना करतो," असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू  लक्ष ठेवून असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.  

Web Title: Prime Minister Narendra Modi paid homage to the dead in a vehicle accident