शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान, उपराष्ट्रपती घरातल्या भुयारातून जाणार नव्या संसद भवनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 06:17 IST

सुरक्षाव्यवस्थेवरील ताण होणार कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नव्याने बांधण्यात येणाऱ्या संसद भवनाखाली तीन मोठी भुयारे असणार आहेत. पंतप्रधान व उपराष्ट्रपतींच्या नवीन घरांना तसेच नव्या संसद भवनातील खासदारांच्या कक्षांना ही भुयारे जोडली जातील. तिथून या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ये-जा सुरू झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवरील ताणही कमी होणार आहे. 

गोल्फ मैदानावर ज्या गाड्या (गोल्फ कार्ट) वापरल्या जातात, त्यांचा वापर या भुयारातून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना नव्या संसद इमारतीत आणण्यासाठी व तिथून परत नेण्यासाठी करता येईल. नवे संसद भवन बांधण्याच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात साऊथ ब्लॉकच्या दिशेला पंतप्रधानांचे नवे निवासस्थान व त्यांचे नवे कार्यालय बांधले जाईल. उपराष्ट्रपतींचे नवे निवासस्थान नॉर्थ ब्लॉकच्या दिशेला असेल. राष्ट्रपतींनी संसदेत येण्याचे प्रसंग खूप कमी येतात. त्यामुळे राष्ट्रपती भवन ते नवीन संसद भवन या दरम्यान भुयार बांधण्याचा अद्याप तरी विचार नाही. सेंट्रल व्हिस्टा प्रॉजेक्टची घोषणा केंद्र सरकारने सप्टेंबर २०१९ मध्ये केली. नव्या संसद भवनामध्ये ९०० ते १२०० खासदारांची बसण्याची सोय असेल. त्याशिवाय नवे संयुक्त सचिवालय बांधण्यात येणार आहे. राष्ट्रपती भवन ते इंदिरा गेट या दरम्यानच्या ३ किमीच्या राजपथाची पुन्हा नव्याने बांधणी करण्यात येईल. 

ऑगस्ट २०२२ पर्यंत प्रकल्प पूर्ण होण्याची आशाn नवे संसद भवन बांधण्याच्या कामास सुरुवात झाल्यानंतर त्या परिसरातील सरकारी कार्यालयांचे नजीकच्या चार ठिकाणी तात्पुरते स्थलांतर करण्यात येणार आहे. २०२२ साली १५ ऑगस्टला देशाचा ७५वा स्वातंत्र्य दिन आहे. तोवर नवीन संसद भवन बांधून पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. n संसदेचे २०२२ सालातील पावसाळी अधिवेशन नव्या संसद भवनात भरविण्याचा मोदी सरकारचा विचार आहे.

टॅग्स :lok sabhaलोकसभा