शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

West Bengal election 2021: सत्तेत येताच ममता सरकार सर्वात पहिले काय करणार? टीएमसी नेत्यानं सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 4:49 PM

हकीम हे कोलकाता पोर्ट येथून निवडणुकीच्या आखाड्यात होते. येथे त्यांचा सामना भाजपच्या किशोर गुप्ता यांच्याशी होता. सहाव्या टप्प्यातील मतमोजणीनंतर ते 33,071 मतांनी आघाडीवर होते.

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. यातच, तृणमूलचे वरिष्ठ नेते तथा मावळे शहर विकास मंत्री फरहाद हकीम यांनी रविवारी कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य स्थिती पुन्हा एकदा रुळावर आणण्यास नव्या सरकारचे प्राधान्य असेल, असे म्हटले आहे. (Primary task of new TMC government will be to put health system back on track firhad hakim)

हकीम म्हणाले, सत्तेत आल्यानंतर कोरोना महामारीचे संकट पाहता तृणमूल काँग्रेसच्या खांद्यावरील जबाबदारीचे ओझे आणखी वाढेल आणि यामुळे विजयाचा उत्सव मागे सोडावा लागेल. आम्ही दोन तृतियांश मतांनी निवडणूक जिंकू आणि बंगालमध्ये सरकार स्थापन करू. ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा आमच्या मुख्यमंत्री बनतील. हा विजय सर्वसामान्य जनतेचा असेल. आमचा विजय आमच्या खांद्यांवर मोठी जबाबदारी घेऊन येईल.''

west bengal election result 2021: ममतांच्या विजयानं राहुल गांधींचं टेंशन वाढणार! आता सोनिया गांधी कोणती खेळी खेळणार?

हकीम म्हणले, ते एका रुग्णालयातून दुसर्‍या रुग्णालयात जात आहेत आणि तेथील सुविधांचा आढावा घेत आहेत. गरजू रूग्णांना मदत करत आहेत. आमचे प्राधान्य आरोग्य व्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यास राहील. हे अत्यंत आव्हानात्मक आहे, हे मला ठाऊक आहे. सध्या मी मंत्री नाही. मात्र, प्रत्येक रुग्णालयाला भेटी देत आहे. मी माझ्या जबाबदारीपासून मागे हटू शकत नाही.''

हकीम हे कोलकाता पोर्ट येथून निवडणुकीच्या आखाड्यात होते. येथे त्यांचा सामना भाजपच्या किशोर गुप्ता यांच्याशी होता. सहाव्या टप्प्यातील मतमोजणीनंतर ते 33,071 मतांनी आघाडीवर होते.

ममता बॅनर्जी सलग तिसऱ्यांदा बंगालच्या CM पदावर बसणे जवळपास निश्चित - ममता बॅनर्जी यांचे सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणे जवळपास निश्चित झाले आहे. भाजपने संपूर्ण तागदीनिशी बंगाल विधानसभा निवडणूक लढली होती. भाजपने येथे आपण 200 हून अधिक जागा जिंकू, असा दावा केला होता. मात्र, त्यांना दाव्याप्रमाणे यश मिळाले नाही.

West Bengal Election Result 2021: जमीन हिलाने वाली जीत मुबारक दीदी, भारीच...; केजरिवालांकडून ममतांना खास अंदाजात शुभेच्छा

ममता बनू शकतात विरोधी पक्षांचा सर्वात मोठा चेहरा - 2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून विरोधी पक्षांत नेतृत्वाचा आभाव दिसत आहे. तेथे सर्वमान्य असा नेताच नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये ममतांची हॅट्ट्रीक झालीच, तर त्या विरोधी पक्षांचा सर्वात मोठा चेहरा बनतील.

विरोधी पक्षांत ममतांच्या बरोबरचीचं कुणीच नाही -विरोधी पक्षांत मोठ्या चेहऱ्याचा विचार करता, राहुल गांधींशिवाय, सपा प्रमुख अखिलेश यादव, बीएसपी प्रमुख मायावती, जेडीएसचे एचडी कुमारस्वामी, कम्यूनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, अशा अनेक नेत्यांची नावे सांगता येतील. मात्र, यांपैकी कुणीही भाजपचा थेट सामना करण्यास सक्षम दिसत नाही. अशावेळी केवळ एकच चेहरा दिसतो, तो म्हणजे ममता बॅनर्जी. ज्या थेट सामन्यात भाजपला पराभूत करताना दिसत आहेत.

 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021Mamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेस