west bengal election result 2021: ममतांच्या विजयानं राहुल गांधींचं टेंशन वाढणार! आता सोनिया गांधी कोणती खेळी खेळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 02:53 PM2021-05-02T14:53:00+5:302021-05-02T15:07:08+5:30

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची (West Bengal Election 2021) मत मोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या मतगणनेत ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांचा तृणमूल काँग्रेस (TMC) हॅट्रिक मारताना दिसत आहे. आतापर्यंत आलेल्या निकालामुसार टीएमसी 202 आणि भाजप 86 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसते. या निवडणुकीचे परिणाम राष्ट्रीय स्थरावरही बघायला मिळू शकतात. ममतांची ही हॅट्रीक थेट राहुल गांधी यांचे टेंशन वाढवणारीही ठरू शकते. (Congress leader Rahul gandhis tension will increase with mamta banerjees victory)

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सर्वच विरोधी पक्ष पांगले - कर्नाटकात काँग्रेस आणि आणि जेडीएसने सरकार स्थापन केले होते, तेव्हा विरोधी पक्षांचे सर्व प्रमुख नेते एकाच व्यासपिठावर आले होते. त्यांनी भाजपसमोर मोठे आव्हान ठेवले होते. मात्र, 2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सर्वच विरोधी पक्ष पांगले.

ममता बनू शकतात विरोधी पक्षांचा सर्वात मोठा चेहरा- 2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून विरोधी पक्षांत नेतृत्वाचा आभाव दिसत आहे. तेथे सर्वमान्य असा नेताच नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये ममतांची हॅट्ट्रीक झालीच, तर त्या विरोधी पक्षांचा सर्वात मोठा चेहरा बनतील.

राहुल गांधींच्या नावावर अद्याप, असा कुठलाही मोठा पराक्रम नाही - विरोधी पक्षांत नेतृत्वाचा शोध घेतल्यास पहिला चेहरा दिसतो, तो म्हणजे राहुल गांधी. पण अद्याप राहुल गांधी यांच्या नावावर, असा कुठलाही मोठा पराक्रम दिसत नाही. त्यांचा परंपरागत मतदारसंघही त्यांना सोडावा लागला आहे. त्यांच्याच नेतृत्वात झालेल्या सलग दोन लोकसभा निवडणुकांत जनतेने त्यांना आणि काँग्रेस पक्षाला सपशेल नाकारले आहे.

राहुल यांच्या नावावर केवळ एकाच चांगल्या विजयाची नोंद - याशिवाय राहुल यांच्या नेतृत्वात एखाद्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा विजय मिळाला, असेही झालेले नाही. राहुल यांच्या नावावर केवळ छत्तीसगड निवडणुकीतील एक चांगल्या विजयाची नोंद दिसते. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने मध्यप्रदेश, राजस्थान आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीतही कसेबसे सरकार बनवले. मात्र राजस्थान वगळता उर्वरीत मध्य प्रदेश आणि कर्नाटकात पुढच्या काही महिन्यांतच भाजप सत्तेवर आला. रास्थानातही काँग्रेसमध्ये हमरी-तुमरी सुरू आहे. यामुळे, राहुल गांधी सत्तेत असतानाही आपल्या आमदारांना एकजूट ठेवण्यात असमर्थ असल्याचा स्पष्ट संकेत जनतेत गेला आहे.

विरोधी पक्षांत ममतांच्या बरोबरचीचं कुणीच नाही - विरोधी पक्षांत मोठ्या चेहऱ्याचा विचार करता, राहुल गांधींशिवाय, सपा प्रमुख अखिलेश यादव, बीएसपी प्रमुख मायावती, जेडीएसचे एचडी कुमारस्वामी, कम्यूनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, अशा अनेक नेत्यांची नावे सांगता येतील. मात्र, यांपैकी कुणीही भाजपचा थेट सामना करण्यास सक्षम दिसत नाही. अशावेळी केवळ एकच चेहरा दिसतो, तो म्हणजे ममता बॅनर्जी. ज्या थेट सामन्यात भाजपला पराभूत करताना दिसत आहेत.

पंतप्रधान मोदींच्या आव्हानाला चोख उत्तर देतात ममता - एखादा राष्ट्रीय मुद्दा असो किंवा पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, अशा अनेक मुद्द्यांवर ममता बॅनर्जी भाजपला अथवा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट टक्कर देताना दिसतात. अगदी हिंदू-मुस्लीम मुद्द्यावरही ममता भाजपला टक्कर देताना दिसतात. पश्चिम बंगालमध्ये भाजपने टीएमसीवर तुष्टीकरणाच्या राजकारणाचा आरोप केला. यावर, ममता यांनी व्यासपीठावरूनच आपण शांडिल्य ब्राह्मण आहोत, असे सांगितले. एवढेच नाही, तर त्यांनी माता दुर्गा पाठही करून दाखवला होता. त्यांनी मुस्लीम मतदारांचाही उघडपणे सपोर्ट केला. अर्थात आपली पोहोच केवळ मुस्लीमच नव्हे, तर हिंदूंतही आहे, असा संदेशही भाजपला देण्यात त्या यशस्वी झाल्या.

राहुल गांधींना स्थापित करण्यासाठी काय करणार सोनिया गांधी? सोनिया गांधी या राहुल गांधींना विरोधकांचा मुख्य चेहरा बनविण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र, ममतांची हॅट्रीक झाल्यास हे आणखी कठीण होईल असे दिसते. कारण केवळ पश्चिम बंगालच नवहे, तर आसाम, केरळ, पुदुचेरी आणि तामिळनाडूतही विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. यांपैकी आसाम, पुदुचेरी आणि केरळमध्येही काँग्रेस पराभूत होताना दिसत आहे. तर तामिळनाडूत डीएमकेच्या ताकदीवर तरताना दिसत आहे.

महत्वाचे म्हणजे 2014च्या लोकसभा निवजणुकीपासूनच जवळपास प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचा सपशेल पराभव होताना दिसत आहे. देशातील अशा राजकीय परिस्थितीत, आता सोनिया गांधी काँग्रेस आणि राहुल गांधींना कशापद्धतीने विरोधी पक्षांचा सर्वमान्य चेहरा बनवून ठेवणार अथवा बनवणार, यासाठी त्या कोणती खेळी खेळणार हेही पाहणे तेवढेच महत्वाचे राहणार आहे.

राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी...