शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयआयप्रकरणी चित्रकर्मींची राष्ट्रपतींना साद

By admin | Updated: September 11, 2015 04:08 IST

तब्बल तीन महिने उलटूनही फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियामधील (एफटीआयआय) आंदोलनावर काहीच तोडगा निघालेला नाही. त्यामुळे यात हस्तक्षेप करण्याची विनंती आता

पुणे : तब्बल तीन महिने उलटूनही फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियामधील (एफटीआयआय) आंदोलनावर काहीच तोडगा निघालेला नाही. त्यामुळे यात हस्तक्षेप करण्याची विनंती आता राष्ट्रीय पुरस्कार विजेते १९० कलाकार आणि दिग्दर्शकांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना केली आहे. यासंदर्भात राष्ट्रपतींना पाठविलेल्या पत्रात या संस्थेला स्वायत्ततेचा दर्जा व अभिमत विद्यापीठ घोषित करावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. राहुल गांधी यांनी यापूर्वी एफटीआयआयला भेट दिल्यानंतर राष्ट्रपतींकडे एफटीआयआयच्या प्रश्नामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अदुर गोपालकृष्णन, सईद मिर्झा, संतोष सिवन, रसूल पुकुट्टी, दिवाकर बॅनर्जी, अंजुम राजावली, कुंदन शाह, गिरीश कासारवल्ली, मणिरत्नम, अभिनेत्री विद्या बालन अशा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या चित्रकर्मींनी देखील राष्ट्रपतींना संयुक्तपणे पत्र लिहिले असल्याची माहिती संस्थेचे आंदोलक विद्यार्थी राकेश शर्मा, विकास अर्स, अमेय गोरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. आंदोलनाचा गुरुवारी ९१ वा दिवस होता.३ जुलै रोजी झालेल्या बैठकीनंतर सरकारतर्फे कोणताही संवाद झालेला नाही. तसेच माहिती प्रसारण मंत्रालयाकडून आलेल्या केंद्रीय समितीचा अहवाल देखील २० दिवस झाले तरी अजून प्रस्तुत करण्यात आलेला नाही. यावरुन सरकारचा बेजबाबदारपणा दिसून येतो, असे शर्मा म्हणाला. गुरूवारी एकाचवेळी मुंबई, कोलकाता, त्रिवेंद्रम येथे विविध चित्रपटकर्मींनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत निषेध नोंदविला आहे.