शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

वाजपेयींचा प्रथम स्मृतीदिन; पंतप्रधान, राष्ट्रपतींसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 8:24 AM

सदैव अटल स्मृती स्थळावर विविध कार्यक्रमांचं आयोजन

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान आणि भाजपाचे दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. त्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील अटल स्मृती स्थळावर अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. वाजपेयींच्या 'सदैव अटल' स्मृती स्थळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली. वाजपेयींनी १६ ऑगस्ट २०१८ ला अखेरचा श्वास घेतला. त्याआधी बराच कालावधीपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे ते सार्वजनिक जीवनात सक्रीय नव्हते. सदैव अटल स्मृती स्थळावर वाजपेयींच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. वाजपेयींची मुलगी नमिता कौल भट्टाचार्य, नात निहारिकासह त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य स्मृती स्थळी उपस्थित आहेत. वाजपेयींच्या स्मृतीदिनानिमित्त सदैव अटलवर भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वाजपेयींच्या निधनानंतर भाजपानं त्यांच्या अस्थी देशातील १०० नद्यांमध्ये विसर्जित केल्या होत्या. याची सुरुवात हरिद्वारमधील गंगा नदीपासून झाली होती. आपल्या कविता आणि भाषणांमुळे लोकप्रिय झालेले वाजपेयी भाजपाच्या संस्थापकांपैकी एक होते. त्यांना २०१४ मध्ये देशातील सर्वोच्च सन्मान असलेल्या भारतरत्ननं गौरवण्यात आलं. १९९६ मध्ये ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले. मात्र त्यांचं सरकार केवळ १३ दिवस टिकलं. १९९८ मध्ये ते दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले. हे सरकार १३ महिने टिकलं. १९९९ मध्ये वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. यावेळी मात्र त्यांनी ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. २००४ नंतर त्यांना प्रकृतीच्या तक्रारी जाणवू लागल्या. त्यानंतर ते राजकारणापासून दूर गेले.  

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीNarendra Modiनरेंद्र मोदीRamnath Kovindरामनाथ कोविंदAmit Shahअमित शहा