आंध्र प्रदेश राजधानी समारंभासाठी तयारी सुरू

By Admin | Updated: October 18, 2015 02:34 IST2015-10-18T02:34:13+5:302015-10-18T02:34:13+5:30

आंध्र प्रदेशची नवी राजधानी अमरावतीचा कोनशिला समारंभ आठवड्यावर येऊन ठेपला असून, त्यासाठी राज्य सरकारकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

The preparations for Andhra Pradesh's capital commemoration begin | आंध्र प्रदेश राजधानी समारंभासाठी तयारी सुरू

आंध्र प्रदेश राजधानी समारंभासाठी तयारी सुरू

हैदराबाद-विजयवाडा : आंध्र प्रदेशची नवी राजधानी अमरावतीचा कोनशिला समारंभ आठवड्यावर येऊन ठेपला असून, त्यासाठी राज्य सरकारकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मान्यवरांना निमंत्रण पाठविण्याच्याही कामाला वेग आला आहे.
आंध्र प्रदेशच्या मंत्र्यांनी अभिनेता व नेता पवन कल्याण आणि शेजारी तेलंगणाच्या नेत्यांना आज व्यक्तिगतरीत्या भेटून निमंत्रणे दिली. पंचायत राजमंत्री चितकायला अय्यना पत्रुदू आणि आरोग्यमंत्री कामिनेनी श्रीनिवास यांनी कल्याण यांना निमंत्रित करण्यासाठी आज त्यांची भेट घेतली. कल्याण हे आघाडीचे अभिनेते असून, त्यांनी तेलुगू देसम पार्टी व भारतीय जनता पक्ष युतीचा मागील निवडणुकीत जोरदार प्रचार केल्यामुळे दोन्ही पक्षांचा फायदा झाला आहे. मात्र, चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गुजरातला जायचे असल्यामुळे, कार्यक्रमाच्या उपस्थितीबाबत आताच सांगता येणार नाही, असे कल्याण यांनी पत्रकारांना सांगितले. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, ‘अमरावती दुसरे हैदराबाद व्हावे, अशी अपेक्षा आहे.’

Web Title: The preparations for Andhra Pradesh's capital commemoration begin