शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

प्रज्ञा - आखाड्यात पावसाची हजेरी व्यापारी हतबल : मोठे आर्थिक नुकसान

By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST

मढ : उदापूर (ता. जुन्नर) येथील काळभैरवनाथ व मुक्तादेवी यात्रा उत्सवाचा आज (दि. १३) दुसरा दिवस असून कुस्त्यांचा जंगी आखाडा अवकाळी पावसामुळे उरकता घ्यावा लागला. त्यामुळे परिसरातून व मुंबई, पुणे, नगर, नारायणगाव, जुन्नर व आदिवासी प˜्यातून आलेल्या बर्‍याचशा मल्लांना कुस्ती न खेळताच परत जावे लागले.दुपारी तीन वाजता पाऊस थोड्या प्रमाणात ...


मढ : उदापूर (ता. जुन्नर) येथील काळभैरवनाथ व मुक्तादेवी यात्रा उत्सवाचा आज (दि. १३) दुसरा दिवस असून कुस्त्यांचा जंगी आखाडा अवकाळी पावसामुळे उरकता घ्यावा लागला. त्यामुळे परिसरातून व मुंबई, पुणे, नगर, नारायणगाव, जुन्नर व आदिवासी प˜्यातून आलेल्या बर्‍याचशा मल्लांना कुस्ती न खेळताच परत जावे लागले.
दुपारी तीन वाजता पाऊस थोड्या प्रमाणात सुरू झाला. तरीही उदापूर ग्रामस्थांनी पाऊस थांबण्याची वाट पाहत चार वाजता थोडा पाऊस कमी झाल्यावर आखाडा सुरू केला.
पहिल्यापासूनच मोठाल्या कुस्त्या लावायला सुरुवात केली. परंतु, काही वेळातच जोरात पाऊस आल्यामुळे ग्रामस्थांना आखाडा आवरता घ्यावा लागला. यामुळे लांबून आलेल्या खूपशा मल्लांना कुस्ती खेळण्याची संधी मिळाली नाही. तरी ग्रामस्थांनी कमी वेळेत जास्तीत जास्त कुस्त्या घेऊन पहिलवानांना न्याय देण्याची व कला दाखवण्याची संधी दिली. या वेळी सरपंच बबन कुलवडे, दत्तात्रय आरोटे, दिलीप आरोटे, अविनाश शिंदे, मच्छिंद्र कुलवडे, रवींद्र भोर, संजय शिंदे, मोहन वलव्हणकर, संजय ढमढेरे, आशीष जगताप, तुकाराम आरोटे, सागर मंडलिक, प्रदीप आमुप व ग्रामस्थ उपस्थित होते.
अवकाळी पाऊस दुपारी तीन वाजल्यापासूनच सुरू झाल्यामुळे परिसरातील भक्त व महिलावर्ग पावसामुळे कालच्या तुलनेत आज दहा टक्केही लोक आले नाहीत. त्यामुळे यात्रेत विक्रेत्यंाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. काल यात्रेत लाखो नागरिकांची गर्दी होती. त्यामुळे आजचा हंगाम मोठ्या प्रमाणात होईल, अशी व्यापार्‍यांना आशा होती. परंतु, अवकाळी पावसाने पूर्ण यात्राच फोडली. यामुळे हॉटेल व्यावसायिक, सरबतवाले, कलिंगड विक्रेते, आईस्किम विक्रेते, तसेच महिलांच्या सौंदर्यप्रसाधनांची, लहान मुलांच्या खेळण्याची विक्री करणारे अशा सर्वच व्यापार्‍यांचे आर्थिक नुकसान झाले.
अचानकच आलेल्या पावसाने ज्या शेतकर्‍यांचे कांदे शेतात काढून पडलेले आहेत व ज्याचे डेंगळे काढून वाळवण्यासाठी उन्हात पसरून ठेवले आहेत, त्यांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली.
फोटो
१) उदापूरला ग्रामस्थांनी पावसातही आखाडा सुरू करून कुस्त्या खेळू दिल्या.
2) अवकाळी पावसामुळे यात्रेत झाला शुकशुकाट.
3) पाऊस आल्यामुळे नागरिक दुकानामध्ये आसर्‍याला उभे होते.
०००००