शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

मीडियामध्ये देश घडवण्याची ताकद - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By admin | Updated: October 25, 2014 13:03 IST

मीडियामध्ये देश घडवण्याची मोठी ताकद आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मीडियाचे कौतुक केले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - देशातील जनमानसांत संदेश पोचवण्यासाठीचे अतिशय प्रभावी माध्यम असणा-या प्रसारमाध्यमांमध्ये देश बदलण्याची, घडवण्याची मोठी ताकद आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मीडियाचे कौतुक केले. दिवाळीनिमित्त दिल्लीतील भाजपा कार्यालयात 'दिवाळी मिलन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी पंतप्रधानांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाऊबीज व नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतानाच मोदींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमास भाजपाध्यक्ष अमित शहा, गृहमंत्री राजनाथ सिंग,परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यसह भाजपाचे महत्वाचे नेते उपस्थित होते.
याआधीही आपली ब-याच वेळा भेट झाली आहे, मी गुजरातमध्ये असतानाही अनेक वेळा तुम्हाला भेटलो आहे. पत्रकार मित्रांशी असलेली ओळख दृढ करण्याचा माझा प्रयत्न आहे, असे मोदी म्हणाले.  गेल्या महिन्याभरापासून आपण 'स्वच्छ भारत अभियाना'बाबतचे लिखाण वाचत असून पत्रकारांनी स्वच्छता, आरोग्यावर सातत्याने लेख लिहीले, त्यांच्या टीकेमुळे स्वच्छतेचा विषय चर्चेत राहिला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सरकार, जनताही जागृत झाली असून ही एकप्रकारे देशसेवाच आहे असे सांगत मीडियामध्ये देश घडवण्याची मोठी ताकद असते, असे ते म्हणाले. फक्त हातात झाडू घेऊन सफाई करायला लागणेच महत्वाचे नाही, तर पत्रकारांची लेखणी हा एकप्रकारचा झाडूच असून तोही स्वच्छतेचे साधन बनला आहे, अशी शब्दांत त्यांनी मीडियाचे कौतुक केले.