शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या धरणांपासून धोका वाढण्याची शक्यता; बहुतांश लोकसंख्या धरणांखाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 05:26 IST

काँक्रीटपासून बनविलेली धरणे साधारणत: जुनी होतात. त्यामुळे जगभरातील हजारो धरणे सध्या धोकादायक स्थितीत पोहोचली आहेत. त्यांची भिंत फुटण्याचा, तडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

न्यूयॉर्क : भारतात २०२५ मध्ये एक हजाराहून अधिक धरणे सुमारे ५० वर्षांची जुनी होणार असून, जगभरात अशा प्रकारची जुनी धरणे भविष्यात धोका वाढविण्याची शक्यता आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे.

अहवालात म्हटले आहे की, २०५० पर्यंत जगभरातील बहुतांश लोकसंख्या २०व्या शतकात बांधलेल्या या हजारो धरणांच्या परिसरात वसलेली असेल व धरणे जुनी झाल्यामुळे त्यांना गंभीर धोका निर्माण झालेला असेल. ‘एजिंग वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर - ॲन इमर्जिंग ग्लोबल रिस्क’ या शीर्षकाखाली हा अहवाल संयुक्त राष्ट्र विद्यापीठाच्या कॅनडास्थित जल, पर्यावरण व आरोग्य संस्थेने तयार केला आहे. अहवालात म्हटले आहे की, जगभरातील एकूण ५८,७०० मोठ्या धरणांपैकी बहुतांश धरणांचे काम १९३० ते १९७० या कालावधीत झालेले आहे. ५० ते १०० वर्षांसाठी त्यांचे बांधकाम झालेले आहे. काँक्रीटपासून बनविलेली धरणे साधारणत: जुनी होतात. त्यामुळे जगभरातील हजारो धरणे सध्या धोकादायक स्थितीत पोहोचली आहेत. त्यांची भिंत फुटण्याचा, तडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

जुन्या धरणांची दुरुस्ती, देखभालीचा खर्च वाढतो व त्यांची पाणी साठविण्याची क्षमताही कमी होते. २०५० पर्यंत जगभरातील बहुतांश लोकसंख्या या धरणांच्या खाली वसलेली असेल. भारत, अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, जपान, झांबिया व झिम्बाब्वे या देशांतील धरणांचे अध्ययन केल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

... तर ३५ लाख लोकांना धोका निर्माण होऊ शकतोसंयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे की, जगातील एकूण धरणांच्या ५५ टक्के म्हणजेच ३२,७१६ मोठी धरणे चीन, भारत, जपान व दक्षिण कोरिया या चार आशियाई देशांतील आहेत. यातील बहुतांश धरणे लवकरच ५० वर्षांपेक्षा जास्त जुनी होणार आहेत.एकट्या भारतात १,११५ मोठी धरणे २०२५ मध्ये ५० वर्षे किंवा त्यापेक्षा जुनी होणार आहेत.देशातील ४,२५० पेक्षा अधिक मोठी धरणे २०५० मध्ये ५० वर्षांपेक्षा जुनी होणार आहेत. ६४ मोठी धरणे २०५० मध्ये १५० वर्षांपेक्षा जास्त जुनी होणार आहेत.भारताच्या केरळमधील मुल्लापेरियार धरण १०० वर्षांपूर्वी बनविलेले असेल व त्याला काही झालेच तर सुमारे ३५ लाख लोकांना धोका निर्माण होऊ शकतो.

 

टॅग्स :Damधरण