शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

"कितने हिडमा मारोगे, हर घर से निकलेगा"; प्रदूषणाविरोधी आंदोलनात नक्षलवादी कमांडरची स्तुती; दिल्लीत मोठा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 13:35 IST

दिल्लीत वायू प्रदूषणाविरोधातील आंदोलनावेळी नक्षलवादी 'हिडमा अमर रहे'च्या घोषणा देण्यात आल्या.

India Gate Protest: देशाची राजधानी दिल्लीतील इंडिया गेट परिसरात रविवारी संध्याकाळी वायू प्रदूषणाविरोधात सुरू असलेल्या एका आंदोलनाला अचानक मोठे राजकीय वळण मिळाले. आंदोलनादरम्यान काही प्रदर्शनकर्त्यांनी नुकताच आंध्र प्रदेशात चकमकीत मारला गेलेला कुख्यात नक्षलवादी कमांडर माडवी हिडमा याचे समर्थन करणारे पोस्टर आणि घोषणाबाजी केल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मावोद्यांनी बस्तर आणि बिजापूरमध्ये जनतेच्या विकासाचे मॉडेल लागू केल्याचेही म्हटलं. यावेळी पोलिसांवर पेपर स्प्रे वापरल्याबद्दल आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करत २३ हून अधिक लोकांना अटक केली.

'हिडमा अमर रहे'च्या घोषणा

माध्यमांच्या वृत्तानुसार, इंडिया गेटच्या सी-हेक्सागॉन परिसरात झालेल्या या आंदोलनादरम्यान प्रदर्शनकर्त्यांच्या हातात माडवी हिडमाचे चित्र असलेले पोस्टर दिसले. आंदोलकांनी 'कितने हिडमा मारोगे', 'हर घर से निकलेगा हिडमा' आणि "माडवी हिडमा अमर रहे" अशा घोषणा दिल्या. माडवी हिडमा (४४) हा एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी कमांडर होता. १८ नोव्हेंबर रोजी तो आंध्र प्रदेशात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला होता. काही पोस्टर्सवर हिडमाची तुलना आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्याशी करण्यात आली होती आणि त्याला 'जल, जंगल और जमीन'चा रक्षक असे संबोधण्यात आले होते.

पोलिसांवर हल्ला, २३ जण अटकेत

प्रदूषणाविरोधात आवाज उठवत असल्याचा दावा करणाऱ्या या आंदोलकांनी सुप्रीम कोर्टाने निदर्शनांसाठी निश्चित केलेल्या जंतर-मंतरऐवजी इंडिया गेटवर बेकायदेशीररित्या आंदोलन सुरू केले होते. पोलिसांनी बॅरिकेड्स तोडून रस्त्यावर बसलेल्या आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला असता, काही लोकांनी अचानक पोलिसांच्या दिशेने पेपर स्प्रे मारला. यामुळे  पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांना आणि चेहऱ्याला तीव्र जळजळ झाली. जखमी पोलिसांना तातडीने आरएमएल रुग्णालयात हलवण्यात आले. यानंतर पोलिसांनी कठोर भूमिका घेत कर्तव्यपथ आणि इतर पोलीस ठाण्यांमध्ये एफआयआर (FIR) दाखल केल्या. अटकेतील २३ जणांना दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात येत आहे.

'नक्सलवादी विचारधारा' पसरवण्याचा आरोप

दिल्लीतील या घटनेवर राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दिल्लीचे विकास मंत्री कपिल मिश्रा यांनी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले. त्यांनी आरोप केला की, प्रदूषण आंदोलनाच्या नावाखाली नक्षलवादी विचारधारा पुढे आणण्याचा हा प्रयत्न होता आणि अशा विचारधारेविरुद्ध हे योग्य उत्तर आहे."

दिल्ली कोऑर्डिनेशन कमिटी फॉर क्लीन एअर या संस्थेने हे आंदोलन आयोजित केले होते. त्यांनी सरकारवर कॉस्मेटिक उपाययोजनांचा आरोप करत, जंगलतोड आणि खाणकाम यांसारख्या विकास धोरणांमुळे प्रदूषण वाढत असल्याचे मत मांडले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Protest Backs Naxal Commander, Sparks Outrage Over Pollution Agenda.

Web Summary : Delhi's India Gate protest supporting slain Naxal commander Hidma sparked controversy. Demonstrators praised Maoist models, clashed with police, leading to arrests. Accusations of promoting Naxal ideology arose.
टॅग्स :delhiदिल्लीair pollutionवायू प्रदूषणPoliceपोलिस