मंत्रिपदे ‘अध्यक्षपदामुळे’ लांबणीवर

By Admin | Updated: September 6, 2014 02:18 IST2014-09-06T02:18:22+5:302014-09-06T02:18:22+5:30

चंद्रपूरचे हंसराज अहिर, अहमदनगरचे दिलीप गांधी व अमरावतीचे शिवसेना खा. आनंद अडसूळ या तीन ज्येष्ठ व अनुभवी खासदारांना आता आला आहे.

The post of the minister was postponed due to the presidency | मंत्रिपदे ‘अध्यक्षपदामुळे’ लांबणीवर

मंत्रिपदे ‘अध्यक्षपदामुळे’ लांबणीवर

रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
‘दुधाची तहान ताकावर.’ या म्हणीचा तंतोतंत प्रत्यय मोदी सरकारच्या संभाव्य विस्तारात मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता असलेल्या चंद्रपूरचे हंसराज अहिर, अहमदनगरचे दिलीप गांधी व अमरावतीचे शिवसेना खा. आनंद अडसूळ या तीन ज्येष्ठ व अनुभवी खासदारांना आता आला आहे. त्यांना मंत्रिपद मिळेलही पण आज तरी त्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे.
मोदी सरकारात राज्यमंत्रीपदे मिळण्याची शक्यता असताना या तिघांनाही स्थायी  समितींचे अध्यक्षपद देऊन प्रथम पक्ष व नंतर मोदींनी धक्का दिला आहे. त्याचवेळी राज्य व गोव्यातील समस्त खासदारांच्या पुढय़ात साक्षात  महागाईच्या मुद्यावरून पंतप्रधानांनी ज्या खासदाराची शाळा घेतल्याची चर्चा भाजपात आहे, त्या किरीट सोमय्या यांचेही हाऊसिंग समितीचे अध्यक्षपद कायम ठेवल्याने पक्षातच आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांच्या वर्तणुकीबाबत पक्षाच्याच काही खासदारांनी वरिष्ठांकडे नाराजी व्यक्त केली होती.
सरकार स्थापनेनंतर ज्या समित्यांची प्रतीक्षा सुरू होती, त्यांचा पेटारा आठवडय़ारंभी फुटला,आणि महाराष्ट्राच्या ज्येष्ठ खासदारांच्या स्वप्नावर तुर्तास तरी विरजण पडल्याची भावना निर्माण झाली. लोकसभेच्या 21 स्थायी विषय समित्या व त्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली. यामध्ये राज्याच्या वाटय़ाला चार समित्या आल्या असून, चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर (कोळसा व पोलाद), अहमदनगरचे दिलीप गांधी(सबऑर्डिनेट लेङिासलेशन), मुंबईचे किरीट सोमय्या (हाऊसिंग) व अमरावतीचे शिवसेना खा. आनंद अडसूळ ( रसायने व खते ) यांना अध्यक्षपदी नेमण्यात आले आहे. 
राजधानीत असे सांगितले, की प्रश्नांची उत्तम जाण, अभायस व चिकाटी असे गुण जमेला असल्याने संघ व पक्षाच्या होकारानंतर मोदी मंत्रिमंडऴाच्या पहिल्या यादीत हंसराज अहीर यांचे नाव होते. पण ते वेळेवर मागे पडले. 
शिवसेनेला कॅबिनेट मंत्रीपदासोतच दोन राज्यमंत्रीपद असावे, असे वाटत असताना व त्यासाठी अमरावतीचे खासदार व माजी अर्थराज्यमंत्री आनंद अडसूळ यांनी स्वत:ला प्रोजेक्ट केल्याने पक्षाने त्यांचे पंख छाटून त्यांना स्यायी समितीवर पाठविले. त्यांची रसायने व खते या समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. या पाश्र्वभूमीवर मंत्रिमडळाचा विस्तार केव्हा, हा प्रश्न विचारला जात असला तरी कोणाची वर्णी लागेल याबाबत संदिग्धता आहे.

 

Web Title: The post of the minister was postponed due to the presidency