पोलीस नाईक निलंबित

By Admin | Updated: July 31, 2015 00:22 IST2015-07-31T00:22:47+5:302015-07-31T00:22:47+5:30

सोलापूर : मालकी हक्काची जागा बळजबरीने नोटरी करून ताबा घेतल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक समीर बालिशा होटगीकर याला पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी निलंबित केले आहे.

Police Naik suspended | पोलीस नाईक निलंबित

पोलीस नाईक निलंबित

लापूर : मालकी हक्काची जागा बळजबरीने नोटरी करून ताबा घेतल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक समीर बालिशा होटगीकर याला पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी निलंबित केले आहे.
सिद्रामप्पा पडशे˜ी यांच्या नावे उत्कर्ष नगर येथे ब्लॉक क्र. २७ व २८ या मिळकतीवर शांताबाई, मुलगा सदानंद व मुलगी शारदा यांचा कायदेशीर अधिकार आहे. हे माहीत असताना सदानंद याच्या व्यसनाधीनतेचा फायदा घेऊन बळजबरीने नोटरी करून ताब्यात घेतली. या जागेत पत्नीच्या नावे चिकनचा व्यवसाय सुरू केला. एक जबाबदार पोलीस कर्मचारी असताना पूर्वपरवानगीशिवाय खासगी व्यवसाय सुरू करून पोलीस नियमावलीचे उल्लंघन केले आहे. हे कृत्य व वर्तन पोलीस खात्याच्या शिस्तीला बाधा आणणारे आहे, अशी नोटीस देऊन समीर होटगीकर याला निलंबित केल्याचे लेखी आदेश पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी काढले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Police Naik suspended