अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी आरोपीस पोलीस कोठडी

By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:26+5:302015-01-23T23:06:26+5:30

सोलापूर : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. नंतर मुलगी गरोदर राहिल्याप्रकरणी शंकर निवृत्ती खंडाळकर (वय 21, रा. हिंगणी (नि), ता. मोहोळ) यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश शब्बीर औटी यांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Police cell accused in rape case for minor girl | अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी आरोपीस पोलीस कोठडी

अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी आरोपीस पोलीस कोठडी

लापूर : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. नंतर मुलगी गरोदर राहिल्याप्रकरणी शंकर निवृत्ती खंडाळकर (वय 21, रा. हिंगणी (नि), ता. मोहोळ) यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश शब्बीर औटी यांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
चार महिन्यांपूर्वी आरोपीने हा प्रकार केल्यानंतर पीडित मुलगी गरोदर राहिली. गुरुवारी तिने मोहोळ पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद नोंदवली. त्याच रात्री पावणेआठ वाजता मोहोळ पोलिसांनी आरोपी शंकर खंडाळकर यास अटक केली. शुक्रवारी त्याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश शब्बीर औटी यांच्यासमोर उभे केले असता त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. आरोपीच्या वतीने अँड. रवींद्र पाटील तर सरकारतर्फे सहायक सरकारी वकील आनंद गोरे यांनी काम पाहिले.
इन्फो बॉक्स
यासाठी मिळाली कोठडी
गंभीर स्वरुपाचा गुन्हा आणि सखोल तपासासाठी.
आरोपीची वैद्यकीय तपासणी करावयाची आहे.
बालकांचे लैंगिक गुन्?ापासून संरक्षण कायदा-2012 अन्वये सखोल तपास.
पीडित मुलगी शासकीय रुग्णालयात अद्याप उपचार घेत आहे.

Web Title: Police cell accused in rape case for minor girl