शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi Birthday Plan : आईचा आशीर्वाद अन् नर्मदा आरती; 'असा' आहे पंतप्रधान मोदींच्या 69 व्या वाढदिवसाचा संपूर्ण कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 07:22 IST

Narendra Modi Birthday Plan: पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आई हिराबेन यांची भेट घेतील. त्यानंतर केवाडिया येथील कार्यक्रमाला पोहचतील

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 17 सप्टेंबर रोजी आपला 69 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. दरवेळीप्रमाणे यंदाही पंतप्रधान मोदी गुजरात या त्यांच्या राज्यांमध्ये वाढदिवस साजरा करतील. यावेळी ते नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर बंधाऱ्याची पाहणी करतील तसेच केवाडियामध्ये एका कार्यक्रमाला मोदी हजर राहणार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या मातोश्री हिराबेन  यांचा आशीर्वाद घेण्यासाठी घरी जाणार आहेत. 

पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आई हिराबेन यांची भेट घेतील. त्यानंतर केवाडिया येथील कार्यक्रमाला पोहचतील. हे ठिकाण नर्मदा जिल्ह्यात येते. याठिकाणी ते नर्मदा पूजा होईल त्यात पंतप्रधान मोदी सहभागी होतील. पुजेनंतर नरेंद्र मोदी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतील. ही जनसभा सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान होईल. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणाला तिरंग्याच्या रंगात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. येथे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचं उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मोदी यांच्या दौऱ्याबाबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी ट्विट करुन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केवाडिया येथे होणाऱ्या नमामि देवी नर्मदा महोत्सवात त्यांचे स्वागत केले आहे. 

यासोबतच भारतीय जनता पार्टीकडूनही नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. पुढील आठवडाभर देशभरात विविध कार्यक्रम राबविले जातील. यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहासह अन्य पदाधिकारीही उपस्थित राहतील. या कार्यक्रमात स्वच्छता अभियान आणि रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातDamधरण