शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
3
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
4
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
5
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
6
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
7
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
8
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
9
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
10
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
11
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
12
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
13
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
14
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
15
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
16
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
17
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
18
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
19
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 17:23 IST

Delhi Blast, Narendra Modi: दिल्लीतील कार स्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ॲक्शन मोडवर! LNJP मध्ये जखमींना भेटून लगेच CCS बैठक घेतली. देशभरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन मोठे धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता.

नवी दिल्ली: लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार स्फोटामुळे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा हादरल्या असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतान दौरा आटोपून परत येताच तात्काळ सूत्रे हाती घेतली आहेत. सरकारने या दहशतवादी हल्ल्याला गांभीर्याने घेतले असून, पंतप्रधानांनी केवळ राजकीय प्रतिक्रिया न देता थेट 'ॲक्शन मोड' मध्ये काम सुरू केले आहे.

भूतानहून दिल्लीत दाखल होताच, पंतप्रधानांनी सर्वप्रथम एलएनजेपी रुग्णालयात जाऊन स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेतली. यानंतर, ते संध्याकाळी ५.३० वाजता आपल्या निवासस्थानी केंद्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक घेणार आहेत. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आदी उपस्थित राहणार आहेत. 

बैठकीचा मुख्य अजेंडा या बैठकीत केवळ दिल्लीपुरता नाही, तर संपूर्ण देशातील सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यात येणार आहे. या दहशतवादी कृत्याला मुळापासून उपटून काढण्यासाठी आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षा धोरणांमध्ये मोठे धोरणात्मक बदल करण्यासाठी या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Blast: PM Modi in Action, High-Level Meeting Soon

Web Summary : Following the Delhi blast, PM Modi convened a high-level security meeting with key ministers and advisors. The meeting aims to review national security and strategize significant policy changes to counter terrorism. An investigation has been ordered by the Home Minister.
टॅग्स :delhiदिल्लीNarendra Modiनरेंद्र मोदीBlastस्फोट