राजस्थानमधून सलमानच्या हत्येचा कट रचला, शार्प शुटरला अटक झाल्याने प्लॅन फसला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 08:23 AM2020-08-19T08:23:31+5:302020-08-19T08:47:19+5:30

देशात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला, या लॉकडाऊनमुळे हा प्लॅन फसला असून शार्प शुटरला पोलिसांनी अटक केली आहे. राहुल उर्फ, सांगा उर्फ बाबाला फरीदाबाद पोलिसांनी उत्तराखंडमधून अटक केली आहे.

A plot was hatched to assassinate Salman khan from Rajasthan, police arrest yuth in faridabad | राजस्थानमधून सलमानच्या हत्येचा कट रचला, शार्प शुटरला अटक झाल्याने प्लॅन फसला

राजस्थानमधून सलमानच्या हत्येचा कट रचला, शार्प शुटरला अटक झाल्याने प्लॅन फसला

googlenewsNext

मुंबई - अभिनेता सलमान खानचे चाहते जगभरात आहेत, तर त्याचा द्वेष करणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. त्यातच, बॉलिवूडमधील नेपोटीझममुळे सिनेसृष्टीतील दिग्गज कुटुंबीयांना लक्ष केलं जातंय. सलमानवर मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. आता, पोलिसांच्या तपासात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सलमानच्या हत्येचा प्लॅन आखण्यात येत होता. त्यासाठी, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानचा कुख्यात गँगस्टर लॉरेंस बिश्नोईच्या गँगने पुढाकार घेऊन हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. 

देशात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला, या लॉकडाऊनमुळे हा प्लॅन फसला असून शार्प शुटरला पोलिसांनी अटक केली आहे. राहुल उर्फ, सांगा उर्फ बाबाला फरीदाबाद पोलिसांनी उत्तराखंडमधून अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार कुख्यात लॉरेंस बिश्नोईने सलमानला ठार मारण्याची जबाबदारी राहुलवर दिली होती. त्यानंतर, राहुलने जानेवारी महिन्यात मुंबईत येऊन सलमान राहत असलेल्या वांद्रे येथील घराची पाहणीही केली होती. दरम्यान, एका खुनाच्या हत्येचा तपास करत असताना, फरिदाबाद पोलिसांनी राहुलला अटक केली होती. या तपासादरम्यान, राहुलने सलमानच्या हत्येची सुपारी घेतल्याची माहिती दिली. 

राजस्थानमधील बिश्नोई समाज काळवीटाची पुजा करतात. सलमान खानवर काळवीटाला मारण्याचा आरोप आहे. सलमानविरोधात बिश्नोई समाजाने हा खटला दाखल केला आहे. तेव्हापासून बिश्नोईने सलमानला मारण्याचा कट रचला होता. यापूर्वीही सन 2018 मध्ये सलमानला मारण्यासाठी बिश्नोईने कुख्यात गुंडाला पाठवले होते. 

Read in English

Web Title: A plot was hatched to assassinate Salman khan from Rajasthan, police arrest yuth in faridabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.